Liquor Smuggling In Goa Dainik Gomantak
गोवा

Liquor Smuggling In Goa: अवैध मद्याच्या तस्करीप्रकरणात कदंबचे दोन कर्मचारी निलंबित

Liquor Smuggling In Goa: अवैध मद्याच्या तस्करीप्रकरणी तेलंगणा अबकारी खात्याच्या पथकाने गोव्याच्या कदंब बसचा चालक उल्हास श्रीधर (52 ) व वाहक आबासाहेब राणे (51) या दोघांना अटक केली.

दैनिक गोमन्तक

Liquor Smuggling In Goa: अवैध मद्याच्या तस्करीप्रकरणी तेलंगणा अबकारी खात्याच्या पथकाने गोव्याच्या कदंब बसचा चालक उल्हास श्रीधर (५२) व वाहक आबासाहेब राणे (५१) या दोघांना अटक केली. त्यांच्या अटकेप्रकरणी कदंब वाहतूक महामंडळाने त्यांना सेवेतून निलंबित केले असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नेटो यांनी दिली.

तेलंगणा अबकारी खात्याच्या पथकाने मेडक जिल्ह्यातील कामकोले टोल प्लाझाजवळ कदंब बस अडवून तपासणी केली असता बसमध्ये विविध बनावटीच्या ७० मद्याच्या बाटल्या सापडल्या. त्याची किमत 1 लाख रुपये आहे.

या अवैध मद्याच्या तस्करीप्रकरणी या दोघांनाही अटक करून मद्य जप्त करण्यात आले आहे. गोव्यातून येणाऱ्या प्रवासी बसमधून मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी होत असल्याची माहिती तेलंगणा अबकारी खात्याला मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.

या मद्याच्या बाटल्या तेलंगणातील काही ठराविक मद्याच्या दुकानांत विकल्या जात होत्या. दामदुप्पट पैसे मिळत असल्याने हे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. या बसमधील मद्याच्या बाटल्या हैद्राबाद येथे विकल्या जात होत्या. त्यामुळे ही बस ठरलेल्या ठिकाणी पोहचण्यापूर्वी कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कदंब बस तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यातील कामकोले टोल प्लाझाजवळ पोहचताच अबकारी खात्याच्या पथकाने ती थांबवली. पथकाने ओळखपत्र दाखवताच कदंबचालक व वाहकाला चांगलाच घाम फुटला.

त्या दोघांची चौकशी केली असता सुरवातीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पथकाने बसची तपासणी सुरू केल्यावर अवैध मद्याच्या बाटल्या सापडल्या. बसचालक व वाहक या दोघांनी त्या विक्रीसाठी घेतल्या होत्या. केबिनमध्ये चेकनाक्यावर तपासणी होत नसल्याचा फायदा घेऊन ही तस्करी केली जात होती.

कदंब महामंडळाची नाचक्की

गोव्यातील कदंब बसची तपासणी अचानक करण्यात आली असता तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. या कदंब कर्मचाऱ्यांनी तस्करीची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे कदंब वाहतूक महामंडळाची नाचक्की झाली आहे.

गोव्यातून हैद्राबादला जाणाऱ्या कदंब बसमधून गोव्यातील मद्याची तस्करी होत असल्याची माहिती तेलंगणा अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या बाटल्या बसमध्ये चालकाच्या केबिनमध्ये लपवण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT