Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

Two Sisters Found Dead in Mokhard: काणकोण तालुक्यातील मोखर्ड येथे राहत्या घरात दोन ज्येष्ठ बहिणींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

चावडी: काणकोण तालुक्यातील मोखर्ड येथे राहत्या घरात दोन ज्येष्ठ बहिणींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रेखा कामत (७८) आणि मेघा कामत (७२) अशी मृतांची नावे आहेत.

दोन्ही बहिणी मोखर्ड येथील आपल्या घरात राहत होत्या. त्या फारशा लोकांमध्ये मिसळत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. रविवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने वाड्यातील नागरिकांनी कुंकळ्ळी येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाला दूरध्वनीवरून माहिती दिली.

भावाने मोखर्ड येथे येऊन घराची पाहणी केल्यानंतर काणकोण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घराचे दार उघडून पाहणी केली असता दोन्ही बहिणींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

दोन्ही बहिणींच्या मृत्यूमुळे परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही स्थानिकांनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली असली, तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी काणकोण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT