Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 30 फूट खोल नदीत कोसळली कार, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa highway accident car plunges into river two dead: अपघातात एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, चालक जखमी झाला आहे.

Pramod Yadav

Mahad News: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार २५ ते ३० फूट नदीत कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय. महामार्गावर मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत आज (२५ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला. अपघात कारचा चक्काचूर झाला आहे.

देवयानी दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर असे अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी मुंबई गोवा महामार्गावरून एक कार महाडकडून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत कार वरील नियंत्रण सुटले आणि कार २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. यात एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, चालक जखमी झाला आहे.

स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले पण दोघांचा मृत्यू झाला होता. तर, जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातस्थळी माणगाव पोलिसांनी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने वर काढण्यात आली. दरम्यान, या भागात यापूर्वी देखील अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT