National Educational Seminar 2024 Canva
गोवा

National Educational Seminar 2024: गोव्यात दोन दिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक चर्चासत्र; सुलभ अभ्यासक्रम, प्रशिक्षणांबाबत होणार चर्चा

National Education Policy: दोनापावला येथील राजभवन येथे ५ आणि ६ डिसेंबर रोजी शालेय शिक्षण बदलासाठी नवीन राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क आधारावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आला आहे. यात देशभरातील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

National Educational Seminar 2024 At Raj Bhavan Dona Paula

पणजी: दोनापावला येथील राजभवन येथे ५ आणि ६ डिसेंबर रोजी शालेय शिक्षण बदलासाठी नवीन राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क आधारावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आला आहे. यात देशभरातील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.

या चर्चासत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची माहिती देण्याबरोबरच त्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः माध्यमिक शिक्षणासाठी राज्यात अभ्यासक्रम सुलभ करणे आणि सक्षमतेवर आधारित अभ्यासक्रम सुरू करणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे इत्यादी मुद्दे या चर्चासत्रात प्राधान्याने घेण्यात येईल.

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद राव पाटील, एनईटीएफचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे, सीईसी गव्हर्निंग बोर्ड (ऑनलाइन) अध्यक्ष प्रा. वसुधा कामत, एनसीईआरटी संचालक प्रा. दिनेश सकलानी, एनआयईपीएचे कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी, भारत सरकारचे एनसीईआरटी, एनसीटीई , एनआयईपीए तसेच इतर राज्यांतील एससीईआरटी चे संचालक उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT