drown
drown  Dainik Gomantak
गोवा

शेततळीत बुडून दोन मुलांचा अंत; करमळी-केरी येथील हृदयद्रावक दुर्घटना

दैनिक गोमन्तक

फोंडा : करमळे-केरी येथील एका बागायतीमध्ये पाणी शिंपण्यासाठी खोदलेल्या शेततळीमध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा अंत झाल्याची हृदयद्रावक दुर्घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली. या दुर्दैवी बालकांची नावे नव्या नाईक (वय ९) आणि हर्ष नाईक (वय ४) अशी आहेत. (Two children drown in farm pond)

करमळे - केरी येथील नाईक कुटुंबीयांवर या दुर्घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून या बालकांचे माता-पिता दोघेही नोकरी करतात. आई-वडील सकाळी कामावर गेल्यानंतर या मुलांना आजी आणि आजोबांकडे पाठवण्यात येते. दीपक नाईक यांच्या घरापासून जवळच शंभर-दीडशे मीटर अंतरावर बागायतीजवळ त्यांच्या भावाचे घर आहे. ही मुले या बागायतीमधून काकाच्या घरी ये-जा करायची.

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या (Margao) हॉस्पिसियो इस्पितळात पाठवले आहेत. नव्या नाईक ही मुलगी प्राथमिक शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होती. घटनास्थळी फोंडा पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक सी. एल. पाटील आणि पोलिस (Police) निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी सहकाऱ्यांसह धाव घेऊन पाहणी केली. दोन्ही निरागस भावंडांचा हृदयद्रावक अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

...आणि मुले पाण्यात तरंगताना दिसली

गुरुवारी दुपारी दीपक नाईक घरी जेवणासाठी आल्यावर त्यांना घरी मुले दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या आई- वडिलांकडे चौकशी केल्यावर ही मुले काकाच्या घरी गेल्याचे सांगण्यात आले. पण जेवणाची वेळ झाली तरी मुले परतली नसल्याने दीपक नाईक यांनी भावाच्या घरी संपर्क साधला असता, मुले केव्हाच निघून गेल्याचे सांगण्यात आल्याने धास्तावलेले दीपक बागायतीतून भावाच्या घरी जात असताना पाण्याच्या तळीत दोन्ही मुले तरंगत असताना त्यांना दिसली. त्यांनी लगेच दोघांना बाहेर काढले आणि फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात (Hospital) नेले असता, त्यांना डॉक्टरांनी (Doctor) मृत घोषित केले. ही माहिती कळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

दोन्ही लहान भावंडे म्हणजे घरातील हसते-खेळते वातावरण होते. दोन्ही भावंडे एकमेकांना कधीच सोडून राहात नव्हती. काकाच्या घरी दोघेही एकदमच जात होती. मात्र, पाण्याच्या तळीत ही मुले कशी पडली, हे समजू शकले नाही. ही मुले पाय घसरून पडली, की पाण्यात उतरली होती, ते कळायला मार्ग नसल्याचे नाईक कुटुंबीयांनी सांगितले. दोन्ही निरागस मुलांच्या मृत्युमुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT