poinguinim Tragic Death Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona: धक्कादायक! एकाच दिवशी दोन सख्या भावांचा हृदयविकाराने मृत्यु; अर्धफोंड- पैगीण येथील घटना

शशिकांत जना नाईक व लक्ष्मीकांत जना नाईक अशी या सख्या भावांची नावे आहेत.

दैनिक गोमन्तक

Poinguinim Tragic Death News: एकाच दिवशी एकाच घरात दोन सख्या भावांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी अर्धफोंड- पैगीण येथे घडली. शशिकांत जना नाईक व लक्ष्मीकांत जना नाईक अशी या सख्या भावांची नावे आहेत.

शशीकांत नाईक (वय 46 ) उठला नसल्याने त्याचा भाऊ लक्ष्मीकांत त्याला उठविण्यास गेला असतो, तो काहीच हालचाल करीत नसल्याने लक्ष्मीकांत घाबरला व अनपेक्षित धक्का बसला.

त्यावेळी त्याच्याही छातीत कळ येऊन तो खाली कोसळला आणि मृत झाला. शशीकांत हा काही वर्षांपूर्वी प्रदेशात नोकरी करत होता. लक्ष्मीकांत लाकूड ठेकेदारी करत होता.

आई - वडील यांचे यापूर्वीच स्वर्गवासी झाले आहेत. त्यामुळे घरची जबाबदारी त्यांची बहीण शैला सांभाळून सरकारी नोकरी करीत आहे. त्याशिवाय त्यांचा एक छोटा भाऊ आहे. दोघा सख्या भावांचा पार्थिवावर आज एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, दोघांचा वाढदिवस 1 जुलै या एकाच दिवशी दरवर्षी साजरा केला जायचा. दोघांचा मृत्युही हृदयविकाराच्या झटक्याने एकाच दिवशी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT