37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोन खेळाडूंना जेलीफिशचा दंश, मणिपूरच्या खेळाडूचा पाय फ्रॅक्चर

दृष्टी जीवरक्षकांनी केले प्रथमोपचार

Pramod Yadav

National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी मणिपूरमधील 16 वर्षीय ट्रायथलीटचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच जेलीफिशने दंश झाल्याने दोन स्पर्धेक मंगळवारी जखमी झाले. खेळाडूंना मिरामार येथे तैनात असलेल्या दृष्टी जीवरक्षकांनी प्रथमोपचार केले.

मिरामार समुद्रकिनारी मिश्र रिले स्पर्धेत मणिपूर ट्रायथलीटचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. यावेळी येथे तैनात असलेल्या दृष्टी जीवरक्षक पूजा बुडे, पुनू वेळीप, हितेश गावडे आणि स्वयंसेवक रमेश गंताली आणि उज्ज्वल प्रसाद हे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात होते.

दृष्टीच्या जीवरक्षक आणि स्वयंसेवक जखमी ऍथलीटच्या मदतीसाठी धावले आणि त्याला समुद्रकिनार्यावर उभ्या असलेल्या दृष्टी मरीन जीपमध्ये नेण्यापूर्वी त्याला स्पाइन बोर्डवर ठेऊन वैद्यकीय मदत केली.

पुढील उपचारासाठी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच, जेली फिशचा दंश झालेल्या दोन खेळाडूंना दृष्टी जीवरक्षकांनी प्रथमोपचार दिले. विनेगारच्या मदतीने त्यांच्या जखमांवर उपचार करण्यात आले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर दोन समुद्रकिनाऱ्यांवर 16 दृष्टी जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एआय नियंत्रित रोबोट देखील तैनात करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT