Mapuca Police arrested Two Person Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: शिवोलीत दुभत्या गाईची हत्या; दुष्कृत्यामुळे स्थानिकांत संताप

छत्तीसगडचे दोन कामगार अटकेत

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Crime News: येथून जवळच असलेल्या शेळ-सडये येथे आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांस भक्षणासाठी छत्तीसगड येथील मजुरांनी शुक्रवारी रात्री घरमालकाच्याच दुभत्या गायीची हत्या केली.

ही घटना समजताच स्थानिकांनी संशयितांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी आतानास राफेल लकडा (30) व मनबहल जोहान एक्का (20) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र उर्फ राजेश मोरजकर (51, शेळ-सडये) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी हे मोरजकर यांच्या घराशेजारीच त्यांच्याकडे भाड्याने राहायचे. मागील दीड वर्षांपासून ते गोव्यात वास्तव्यास असून ते मजुरी करीत होते. दरम्यान, शुक्रवारी मोरजकर यांनी नेहमीप्रमाणे

गाय आणि तिचे वासरू घराजवळच्या एका माडाला बांधले होते. त्या दिवशी संशयितांनी मांस भक्षणासाठी संध्याकाळी 7 ते रात्री 10 च्या दरम्यान शेळ-सडये येथील आजोबा देवस्थान सभागृहाच्या मागील शेतात गायीची हत्या केली. या प्रकरणी दोन्ही संशयितांवर प्राणी क्रुरता कायद्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सध्या ते म्हापसा पोलिस कोठडीत आहेत.

असा झाला प्रकार उघड

  1. गायीची हत्या केल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान दोन्ही संशयित एका सहकारी महिलेसमवेत गायीचे मांस गोणपाटात भरून जात होते.

  2. यावेळी रस्त्याशेजारच्या रिसॉर्टमधील सुरक्षारक्षक दाभोळकर नावाच्या व्यक्तीला संशय आल्याने त्यांना हटकले होते. त्याने हा प्रकार काहींना सांगितला.

  3. संशय आल्याने तपासणी केली असता एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेजण रात्रीच्या वेळी शेतातून पिशवी भरुन काहीतरी घेऊन जाताना दिसत होते.

  4. यावरून स्थानिकांनी त्यांना पकडून संशयितांची चौकशी केल्यावर दोघांनीही दुष्कृत्य कथन केले. यानंतर स्थानिकांनी त्यांना शनिवारी रात्री चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी हत्यारे केली जप्त

मोरजकर यांच्या मालकीचे दीड वर्षांचे वासरु अजूनही गायब आहे. संशयितांनी गोहत्या करून उर्वरित गोमांस हे कुठेतरी जमिनीत पुरल्याचा संशय आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक चॉपर जप्त केले.

गाय व वासरू बांधून ठेवलेल्या जागेवरुन 100 मीटर अंतरावरील शेतात पोलिसांना हे हत्यार आणि गाईचे शीर सापडले. स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर यांच्या तत्परतेमुळे दोन्ही संशयितांना जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT