Two arrested by Mapusa police for committing theft of scooter
Two arrested by Mapusa police for committing theft of scooter  Dainik Gomantak
गोवा

Crime News: दुचाकी चोरीप्रकरणी दोघा स्थानिक युवकांना अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

Two Arrested By Mapusa Police For Committing Theft Of Scooter: तळीवाडा, म्हापसा येथील दुचाकी चोरी प्रकरणात दोघा संशयितांना अटक करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले संशयित हे स्थानिक असून ही घटना 7 ते 8 सप्टेंबर दरम्यान घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेतला.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळीवाडा, म्हापसा येथे रस्त्यावर पार्क करण्यात आलेली ऍक्टिव्हा स्कूटर अज्ञातांनी चोरल्याची तक्रार वाहन मालकाने म्हापसा पोलिसांत दिली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार केले व घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले.

त्याची तपासणी केली असता दोन संशयित स्कूटरची चोरी करताना आढळून आले. संशयित चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

दुचाकी चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून संशयितांना अटक करण्यात आली. दित्तेश गडेकर (33) व शिवम वेर्णेकर (30) दोघेही रा. बार्देश, म्हापसा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या कारवाईत हेड कॉन्स्टेबल तुकाराम शिरोडकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, अक्षय पाटील, आनंद राठोड, साईदास पणजीकर, राजेश कांदोळकर यांनी सहभाग घेतला.

तर एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी आणि उत्तर गोवा एसपी बोसुएट डिसिल्वा यांच्या देखरेखीखाली पीआय सीताकांत नायक अधिक तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एक जणाला अटक

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT