Gold  Dainik Gomantak
गोवा

Goa Gold Scam: ७१ गुंतवणूकदारांना कोटींचा गंडा घालणाऱ्या दोघांना अटक; दुप्पट नफ्याचे आमिष

Goa Crime: सोने व्यापारात पैसे गुंतवून दुप्पट नफा देण्याच्या बहाण्याने पर्वरी व म्हपसा परिसरात ५.८ कोटींचा गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सोने व्यापारात पैसे गुंतवून दुप्पट नफा देण्याच्या बहाण्याने पर्वरी व म्हपसा परिसरातील सुमारे ७१ गुंतवणूकदारांना ५.८ कोटींचा गंडा घालणाऱ्या मुंबईस्थित व सध्या सुकूर येथे राहणाऱ्या अक्षय अनंत सावंत (३४) व पल्लवी आत्माराम घोडगे (३३) या दोघांना क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी गालजीबाग - काणकोण येथील एका फ्लॅटमधून अटक केली. त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईतून संशयिताकडून बँकांचे २० पासबुक, १३ विविध बँकाचे धनादेश, १ लॅपटॉप, १ प्रिंटर, १४ मोबाईल्स संच, १ एक्स्टरनल हार्ड डिस्क, संशयित अक्षय सावंत याचा पासपोर्ट, १ पेन ड्राईव्ह, ८ बँकांचे एटीएम कार्डस्, मोबाईल्सची ११ सिमकार्डस जप्त केले आहेत. या संशयिताविरुद्ध कणकवली, सातारा व मुंबई येथे फसवणुकीचे गुन्हे २०१५ पासून नोंद आहेत. २०१७ साली मुंबई येथे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यावर त्याने गोव्यात बस्‍तान हलविले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अक्षय सावंतने गोव्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये पर्वरी येथील एका फ्लॅटमधून वेंकटेश्‍वर बुलियन गोल्ड नावाने कंपनी सुरू केली होती. तो स्वतः सोन्याचा व्यापारी असल्याचे भासवून त्याने काहींचा विश्‍वास संपादला होता.

सुरुवातीला त्याने सोने व्यापारात पैसे गुंतवून बदल्यात दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने तक्रारदार वासिम खान याचे पैसे गुंतवले होते.आणखी चौघांचेही पैसे गुंतवले. त्यांना काही महिने चांगला नफाही दिला. त्यामुळे तक्रारदारांनी आणखी काहींना या कंपनीत गुंतवण्यास सांगितले. काही महिन्यांनी संशयित नफा देण्यास अयशस्वी ठरला. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. त्याची चाहूल लागताच संशयिताने पर्वरीतील फ्लॅटमधून पसार झाला होता.

अन् संशयित गालजीबाग येथे सापडला

याप्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात ३ एप्रिल २०२३ रोजी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर ही तक्रार क्राईम ब्रँचकडे वर्ग झाली होती. पोलिस त्याचा मागोवा घेत होते, मात्र तो मुंबईतील पत्त्यावर सापडत नव्हता. त्याने दक्षिण गोव्यात सोन्यात पैसे गुंतवण्याचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळताच गालजीबाग - काणकोण येथील फ्लॅटवर छापा टाकून अटक केली. त्यावेळी त्याच्यासोबत संशयित पल्लवी घोडगे होती. ती या व्यवसायाचा हिशोब ठेवत होती. त्यामुळे तीही या गुन्ह्यात सामील असल्याने अटक केल्याची माहिती क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT