Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Illegal Liquor Seized: गुजरातला दारू नेणाऱ्या दोघांना मडगाव रेल्वेस्थानकावर अटक

Illegal Liquor Seized: त्यांच्याकडून सुमारे 15 हजारांच्या व्हिस्की, रमच्या 1990 बाटल्या जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्यातून बेकायदेशीररित्या मद्यसाठा गुजरात येथे घेऊन जाणाऱ्या संशयित गोपालभाई सोळंकी (38) व मनोहर खमादिया (19) यांना कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव स्थानकावरच बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे 15 हजारांच्या व्हिस्की, रमच्या 1990 बाटल्या जप्त केल्या आहेत.

मडगाव रेल्वे स्थानकावर गस्तीवर असणाऱ्या कोकण रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता,त्यांना योग्य उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे दोघांकडील बॅगांची झडती घेण्यात आली. तेव्हा ते दोघे संशयित बेकायदेशीररित्या गोव्यातून मद्यसाठा गुजरात याठिकाणी विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले.

संशयित गोपालभाई सोळंकी व मनोहर खमादिया हे दोघेही सुरेंद्रनगर गुजरात येथील आहेत. गुजरातमध्ये दारुबंदी असल्याने गोवा बनावटीची दारु रेल्वेतून नेऊन तिथे विकली जाणार होती. त्यामुळे दोन बॅगा भरून मद्यसाठा त्यांनी सोबत घेतला होता. कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह कॉ. सत्यवान नाईक, समीर शेख, कुलदीप गावकर, श्रीनिवास रेड्डी, अमरदीप चौधरी यांनी हे कारवाई केली. पुढील तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT