Davorlim Murder Case Dainik Gomantak
गोवा

Davorlim Murder Case: सादिक बेल्लारी खून प्रकरणात दोघा संशयितांना कर्नाटकातून घेतले ताब्यात

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे घेतला संशयितांचा शोध

गोमन्तक डिजिटल टीम

Two Accused Nabbed In Karnataka: यापूर्वी एका खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या, पण सध्या जामिनावर मुक्त झालेल्या सादिक बळ्ळारी या युवकाचा रुमडामळ-दवर्ली येथे दिवसाढवळ्या खून करण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस तपास करीत होते.

दरम्यान या प्रकरणात दोघा संशयितांना कर्नाटक येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. आज सकाळी रुमडामळ येथे खून करुन ते कर्नाटकात पळून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे.

शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सादिक बळ्ळारी याची आई व वडील घरातून बाहेर पडल्यानंतर तो घरी एकटाच असल्याचे पाहुन संशयित मारेकरी घरात आत शिरले व सादिकच्या गळ्यावर चॉपरचे वार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर ते पळून गेले.

ते पळून जातानाचे दृष्य या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिसांनी तत्काळ वेगाने चक्रे फिरवत फरार संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

संशयित कर्नाटकच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. मायणा कुडतरी पोलीसांच्या एका पथकाने कर्नाटकातून संशयितांना ताब्यात घेतले. तौसिफ कडमणी आणि कादर खान अशी या संशयितांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT