Pramod Sawant, Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

'मुख्‍यमंत्र्यांच्‍या डॉक्‍टरकीचा राजीनामा मीच स्‍वीकारला'! आरोग्‍यमंत्री राणेंनी जागवल्या आठवणी; हात उंचावून एकसंध असल्‍याचा निर्वाळा

Pramod Sawant, Vishwajit Rane: मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सरकारी वैद्यक सेवेतील राजीनामा आरोग्‍यमंत्री या नात्‍याने आपणच स्‍वीकारला होता. त्‍यानंतर ते राजकारणात येऊन आमदार झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सरकारी वैद्यक सेवेतील राजीनामा आरोग्‍यमंत्री या नात्‍याने आपणच स्‍वीकारला होता. त्‍यानंतर ते राजकारणात येऊन आमदार झाले. पुढे मुख्‍यमंत्रीही झाले. आज त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली काम करत असल्‍याचा आपल्‍याला अभिमान आहे, असे म्‍हणत आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी सावंत यांच्‍या राजकारणातील प्रवेशावर भाष्‍य केले.

तुये येथील सरकारी इस्‍पितळाच्‍या उद्‍घाटन समारंभाला मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे, माजी मुख्‍यमंत्री प्रा. लक्ष्‍मीकांत पार्सेकर, आमदार जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी सांगितले की, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आपले नाते अनेक वर्षांपासूनचे आहे. राजकारणात प्रवेश करण्‍याआधी ते डॉक्‍टर म्‍हणून सेवा देत होते. राजकारणात येण्‍याचे निश्‍चित झाल्‍यानंतर त्‍यांनी डॉक्‍टरकीचा राजीनामा दिला आणि तत्‍कालीन आरोग्‍यमंत्री या नात्‍याने तो आपण स्‍वीकारला होता. हे पार्सेकरांनाही माहीत आहे.

काही कारणांमुळे तेव्‍हा ते आमदार बनू शकले नाहीत. परंतु नंतर ते आमदार झाले, आता मुख्‍यमंत्री आहेत आणि त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली आपण सध्‍या काम करत असल्‍याचा आपल्‍याला अभिमान आहे, असेही राणे यांनी नमूद केले. दरम्‍यान, कार्यक्रमानंतर मंत्री राणे यांनी मुख्‍यमंत्र्यांचा हात हातात घेऊन, उंचावून ‘आम्‍ही एकच आहोत’ असा निर्वाळा दिला. यावेळी वातावरण हलकेफुलके बनले. सोबत आमदार जीत आरोलकरही होते.

...तर २००८ मध्‍येच झालो असतो आमदार : मुख्‍यमंत्री

आरोग्‍यमंत्री राणे यांनी करून दिलेल्‍या आठवणींना उजाळा देताना मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, राजकारणात येण्‍यापूर्वी आपण आयुर्वेदिक डॉक्‍टर म्‍हणून सेवा देत होतो. राजकारणात येण्‍याचे ठरल्‍यानंतर आपण डॉक्‍टरकीचा राजीनामा दिला आणि तत्‍कालीन आरोग्‍यमंत्री या नात्‍याने तो विश्‍‍वजीत राणे यांनी स्‍वीकारला. परंतु त्‍यावेळी गणित चुकले. अन्‍यथा आपण २००८ मध्‍येच आमदार झालो असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT