Tuyem hospital demand Dainik Gomantak
गोवा

Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

Tuyem hospital demand: तुये येथे शंभर कोटीहून अधिक रूपये खर्चून ‘गोमेकॉ’शी संलग्न करता येईल, असे भव्य हॉस्पिटल इमारत उभारून आता ८ वर्षे होत आली परंतु तिचे लोकार्पण रखडले आह.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: तुये येथे शंभर कोटीहून अधिक रूपये खर्चून ‘गोमेकॉ’शी संलग्न करता येईल, असे भव्य हॉस्पिटल इमारत उभारून आता ८ वर्षे होत आली परंतु तिचे लोकार्पण रखडले आहे, तिथे आवश्‍यक गोष्टी अद्याप आलेल्या नाहीत.

पेडणेच्या जनतेला उत्तम वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टीने सरकारने तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करा, अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन छेडू, असा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीचे देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिला.

तुये हॉस्पिटल संबंधी आरोग्य संचालनालयात निवेदन दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी समितीचे इतर सभासदही उपस्थित होते. दरम्यान प्रभुदेसाई म्हणाले, तुयेतील हॉस्पिटलला मागील ८ वर्षात पाच वेळा रंगरंगोटी केली परंतु अजून ते पेडणेकरांच्या सेवेसाठी सुरू केले जात नाही.

हे हॉस्पिटल ‘पीपीपी’ तत्त्वावर सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे, परंतु आम्हाला ‘गोमेकॉ’शी संलग्न असणारेच हॉस्पिटल हवे आहे. या हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी १३ कोटींची निविदा काढण्यास समंती दिली होती परंतु अजून निविदा काढली गेली नाही.

पेडणे हा ग्रामीण भाग आहे, पर्यटनाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे येथे एक चांगले हॉस्पिटल उभारणे गरजेचे आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी आपल्या कार्यकाळात या हॉस्पिटलसाठी प्रयत्न केले परंतु त्यांच्यानंतरच्या आमदारांनी जो पाठपुरावा करून हॉस्पिटल सुरू करायला हवे होते, ते झालेले नाही. ही वस्तुस्थिती असल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT