पेडणे: तुये येथील शेती मळ्याच्या पाटातील गाळ उपसण्याचे काम न करताच कंत्राटदाराला पूर्ण रक्कम अदा करण्यात आल्याचा आरोप तुये शेतकरी संघटनेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी तुळशीदास राऊत, जुझे लोबो आणि पंचसदस्य नीलेश कांदोळकर उपस्थित होते.
जुझे लोबो यांनी सांगितले की, जलस्रोत खात्याने तुयेतील तीन खाजन शेतींसाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या दोन निविदा काढून ‘गोल्डन ब्रिक्स वर्क स्ट्रक्चर’ या कंत्राटदाराला काम दिले होते. मात्र प्रत्यक्षात फक्त एका शेतातील गाळ उपसा झाला, तरी काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देऊन जानेवारी २०२६ मध्ये संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली.
शेतकऱ्यांनी चौकशी केल्यानंतर कामे पूर्ण न झाल्याचे उघड झाले. पंचायत व जलस्रोत खात्याच्या संयुक्त पाहणीतही काम अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले.
फक्त ११ दिवस केले काम : फक्त ११ दिवस जेसीबीने काम झाले असताना लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.