Turmeric Plantation in Sattari Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड

जोशी यांनी ठेवला आदर्श : युवकांनी पुढे येण्याची व्यक्त केली गरज

दैनिक गोमन्तक

वाळपई : हळदीला पिवळे सोने म्हटले जाते. हळदीचे गोव्याशी अतूट नाते आहे. गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यामुळे हळदीचे पेटंट भारताला मिळाले. पण याच भूमीत हे बहुऔषधी गुण असलेले पीक दुर्लक्षित आहे. मात्र आंबेडे-नगरगाव येथील शेतकरी अनिरुद्ध जोशी यांनी एक एकर जमिनीत हळदीची लागवड करून इतरांपुढे आदर्श घालून दिला आहे.

जोशी यांनी प्रथमतः सेलम जातीचे बियाणे आंबेगाव (सावंतवाडी) महाबळ यांच्याकडून आणले. प्रायोगिक तत्त्वावर एक प्लॉट लावला. त्यानंतर यंदा सेलमबरोबर फुले स्वरुपा जातीचे बियाणे पुण्यातून आणून लावण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी हळदीची वेगवेगळ्या पद्धतीने लागवड केली आहे. यंदाचे हे सहावे वर्ष असून, त्यांना त्यात यश मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी तसेच युवा वर्गाने हळद पिकाची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक

सरकारने विविध योजना आखताना अशा पिकांना योग्य किंमत तसेच बाजारपेठ मिळण्यासाठी हातभार लावला पाहिजे. तसेच बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. तयार झालेल्या हळदीच्या विक्रीसाठी बागायतदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हळद लागवड अशी करावी...

  • दोन ओळींमधील जागा फोडून शेणखत मिसळून भर घालावी. याचा फायदा असा की माती परतली जाते. उन्हामुळे मातीतील कीड मरते व विशेषतः कंद माशीचा प्रादुर्भाव होत नाही.

  • भर घातल्याने दोन झाडांमध्ये आलेले तण मातीखाली कुजवले जाते.

  • लावणी योग्य वेळेत झाल्यास नागपंचमीपर्यंत रोपे पहिली भर घेण्यासाठी योग्य होतात व दुसरी भर पहिल्या भरीनंतर एका महिन्याने घेणे फायदेशीर ठरते.

  • साधारणतः दहा महिन्यांनी पीक काढणीस येते. म्हणजे फेब्रुवारीत पीक काढून होते व हळदीवर प्रक्रिया करण्यास पुरेसा वेळ मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT