मुसळधार पावसाने कुशावतीला पुन्हा पूर

नदी आणि रस्ता आला समांतर पातळीला; वाहतूकही वळवली
flood in Goa Kushavati River
flood in Goa Kushavati River Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : केपे येथील कुशावती नदीला पूर आला असून पारोडा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता आणि नदीचे पाणी समान पातळीवर आले आहे. या पाण्याचा प्रवाह प्रचंड असून या मुळे या नदीच्या काठावर असलेल्या पारोडा आणि अवेडे या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

देऊळमळ केपे येथेही कुशावती नदीची पातळी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही नदी आता प्रचंड वेगात दुथडी वाहू लागली आहे.

दरम्यान पारोडा येथे रस्ता पाण्याखाली गेल्याने मडगाव - सांगे दरम्यानची वाहतूक चांदर मार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे कित्येक बस चालकांनी आपल्या बसेस रस्त्यावर न आणल्याने सामान्य वाहतुकीवर ताण आला आहे. बसेस कमी असल्याने प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

flood in Goa Kushavati River
विधानसभा अधिवेशन नियोजित वेळेत घेण्याची 'आरजी'ची मागणी

दरम्यान हवामान विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे आज 8 जुलै रोजी राज्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने आपली उपस्थिती दर्शवली आहे. राज्यभरामध्ये धो-धो पावसाने गोवेकरांची तारांबळ उडाली आहे.

रेड अलर्ट जारी केल्यामुळे कुणीही कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज आणि उद्या अशी दोन दिवस सुट्टी देखील देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com