'हळदी'चा शेतमळा Daink Gomantak
गोवा

Goa: धुमासे गावात बहरला 'हळदी'चा शेतमळा

(Goa) शेतकऱ्यांचे संघटित प्रयत्न आले फळाला

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली तालुक्यातील कृषीप्रधान (Agricultural) 'धुमासे' गावातील शेतकऱ्यांनी (Farmer) सामूहिकरित्या केलेला हळद (Turmeric Plantation ) लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरत असून, शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना फळ येण्याची (Success) आशा निर्माण झाली आहे. यंदा प्रथमच लागवडीखाली आणलेला जवळपास अडीच 2.5 एकर क्षेत्राफळ (Area) असलेला शेतमळा 'हळदी'च्या रोपांनी पूर्णपणे बहरला आहे.

मळा बहरला

कृषीप्रधान 'धुमासे' या छोट्याशा गावातील शेतकरी यंदा प्रथमच हळद लागवडीकडे वळले आहेत. माजी आमदार नरेश सावळ यांच्या पुढाकारातून आणि कृषी खात्याच्या सहकार्याने धुमासेतील पाच (5) कुटुंबातील शेतकऱ्यांनी मिळून दहा हजार (10,000) चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या शेतजमिनीत (अडीज एकर) 2.5 हळद लागवड केली आहे. आमठाणे धरणापासून जवळच असलेल्या भरड शेतजमिनीत ही हळद लागवड करण्यात आली आहे.

भिसो नाईक, न्हानू नाईक, नारायण नाईक, आनंद नाईक, रवींद्र नाईक, उमानाथ नाईक, उदय नाईक, अर्जुन नाईक आदी पाच कुटुंबातील शेतकऱ्यांनी सामूहीकरित्या हळद लागवडीचा प्रयोग केला आहे.

औषधी गुणधर्म असलेल्या आणि दैनंदिन आहारातील एक मुख्य घटक असलेल्या हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी आणि सामाजिक क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेल्या हळदीला बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. हळद एक नगदी पिक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच धुमासेतील शेतकऱ्यांनी हळद लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कमी मेहनत

गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येवून पडीक शेतजमीन हळद लागवडीखाली आणली आहे. हळद पिक घेण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत नाही. आणि रानटी जनावरांपासूनही या पिकाला उपद्रव होण्याचा धोका नसतो. हळद हे नगदी पिक आहे. यंदा चांगले पिक आल्यास भविष्यात लागवडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

भिसो नाईक, शेतकरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT