व्हडल्या दिवळी म्हणजेच तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. घरांच्या अंगणातील तुळशी वृंदावने सजली असून पाट मांडत दुसऱ्याबाजूला नवरदेवाने ही आपली जागा घेतली आहे. राज्यात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडला आहे. या कार्यक्रमात लहानांबरोबर मोठ्यांनीही आपला सहभाग नोंदवला आहे.
(Tulsi Vivah celebration starts in Goa )
राजधानी पणजीसह मडगाव, वास्को परीसरात तुळशी विवाहाची धामधूम सुरु आहे. काही ठिकाणी लग्न मंडप तयार आहेत, तर काही ठिकाणी केवळ अक्षदा बाकी आहे. तसेच काही ठिकाणी विवाह संपन्न झाले आहेत. गोव्यात बहुतांश घरांत कार्तिक एकादशीला तुळशी विवाह लावण्याची प्रथा आहे. हा मुहूर्त साधत अनेक ठिकाणी आज अक्षदा टाकण्यात आल्या आहेत.
हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाह लावल्यानंतर घरातील लग्नकार्यास सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर तुळशी विवाहाची खास तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. ही तयारी आज विवाह कार्यक्रमानंतर थांबली आहे. त्यामूळे आता राज्यात धामधूमीचं वातावरण आहे.
तुळशी विवाहासाठी बाजारपेठा सजल्या
तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा ही सजल्या आहेत. त्यामूळे साहित्य खरेदीसाठी ही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आज दिवसभर राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये होते. या साहित्यामध्ये तुळशी विवाहासाठी लागणारे ऊस, चिंच, आवळा, दिंडा आदी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.