Goa Agriculture: स्वयंसाहाय्य गटांनी फुलवले भाजीचे मळे

Goa Agriculture: झेंडूचीही लागवड : खाणी बंद झाल्यानंतर आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Agriculture: राज्य सरकारने नुकतीच स्वावलंबी योजना सुरू केली आहे. त्याचा आधार घेत धारबांदोडा कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार किर्लपाल-दाभाळ येथील महिलांनी १० बचत गटांच्या माध्यमातून शेती उत्पादनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे. या भागातील खाणी बंद झाल्यामुळे त्यांच्या मिळकतीवर मोठा परिणाम झाला होता.

अशा बिकट स्थितीत हतबल न होता त्यांनी कृषी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि भाजीचे मळे फुलवले. सुमारे ६० महिलांनी एकत्र येत १० बचत गट स्थापन केले. हे गट सध्या ४० कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी कार्य करत आहेत. ही सर्व कुटुंबे भाजीपाल्याच्या उत्पादनातून स्वावलंबी झाली आहेत. झेंडू फुलांची लागवड केल्याने चार पैसे त्यांच्या गाठीला उरत आहेत.

सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या जमिनीत छोट्या प्रमाणात भाजी लागवड सुरू केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी जमीन भाडे तत्त्वावर घेतली. या महिला हिरवी मिरची, लाल मिरची, वाल, वांगी, नवलकोल, चिटकी यांचे उत्पादन घेतात. भाज्यांसोबतच झेंडूची फुले, मशरूम, स्वीट कॉर्न, कांदा यांचीही लागवड केली. आम्ही लागवड केलेली भाजी धारबांदोडा कृषी विभागातील कर्मचारी विकत घेतात;

पण अन्य लोकांना भाजी विक्री करण्यासाठी धारबांदोडा तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयाजवळ पुरेशी जागा द्यावी, अशी मागणी तुळशी गावकर यांनी केली आहे. या महिला अत्यंत कष्टाळू असून त्या पारंपरिक शैलीनुसार परंतु आधुनिक तंत्राचा वापर करून पिकांवर प्रयोग करतात. भाडेतत्त्वावर जमीन घेऊन स्वावलंबी जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. या महिला त्यांच्या कुटुंबाच्या कर्त्या-धर्त्या बनल्या असून त्यांचे पुरुष भागीदारही त्यांना शेतीकामात साथ देतात.

- कृष्णनाथ गावस, साहाय्यक कृषी अधिकारी, धारबांदोडा.

Goa Agriculture
SBI Share Price: SBI ने दिली आनंदाची बातमी, कमाईच्या बाबतीत 'चांदी'!

मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहन

लीला गावकर या गांडूळ खतनिर्मिती करतात. लक्ष्मी स्वयंसाहाय्य गटाच्या माध्यमातून कांदा, मशरूम, भाजीपाला आणि झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. श्री सती भगवती सेल्फ हेल्प ग्रुपमधील तुळशी गावकर यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सन्मानित केले होते. या सन्मानामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले, असे या महिलांनी सांगितले.

खतनिर्मितीला उत्स्फूर्त प्रतिसाद

येथील चार बचत गट गांडूळ खत निर्मितीमध्ये उतरले आहेत. दरवर्षी सुमारे २० टन कंपोस्ट खत तयार केले जाते. गांडूळ खत १५ ते १८ रुपये किलो दराने विकले जाते. विशेष म्हणजे त्यांच्या उत्पादनासाठी, त्यांचे कंपोस्ट खत खरेदी करण्यासाठी बाजारपेठ त्यांच्या दारापर्यंत पोहोचली आहे. कोणत्याही ठिकाणी कितीही प्रमाणात कंपोस्ट खत पुरवण्याची त्यांची तयारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com