Tulsi Vivah 2022 Dainik Gomantak
गोवा

Tulsi Vivah 2022: राज्यात तुळशी विवाहाची धुम कायम

अनेकांनी साधला प्रबोधिनी एकादशीचा मुहूर्त

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा राज्यातील बहुतेक ठिकाणी मंदीरात, घराघरात प्रबोधिनी एकादशी दिवशी तुळशी विवाह समारंभ थाटात साजरा करण्यात आला. यावेळी 'गोविंदा' म्हणत भाविकांनी चुरमुरे व पोहे हवेत उडविले व ते भाविकांनी हातात पकडून ग्रहण केले.

(tulsi vivah celebration continues in goa)

आज अनेक घरात प्रबोधिनी एकादशी दिवशी तुळशी विवाह समारंभ साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत गोवा राज्यात तुळशी विवाह समारंभ होणार आहे. या दरम्यान विविध ठिकाणच्या मंदिरात महिला दिवजोत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे दिवजोत्सव सणाची जय्यत तयारी सुरू आहे.

तुळशी विवाहासाठी सकाळी ऊस, चिंच डहाळ्या तुळशी रोपट्याला बांधून त्याची पुजा करण्यात आली. यानंतर श्रीकृष्ण व तुळशी विवाह लावून आरत्या करण्यात आल्या. प्रबोधिनी एकादशी दिवशी सुवासिनींनी उपवास पाळून कणुंगे फराळ घेतला.

महिलांनी तुळशीच्या ओटी भरल्या

गावातील मुले पिशव्यात प्रत्येक घरातील तुळशी विवाह समारंभाला प्रसाद म्हणून वाटलेले पोहे, चुरमुरे व इतर गोड पदार्थ एका पिशवीत जमविताना दिसली. आणि दुसऱ्या दिवशी सुध्दा आनंदाने खातात. महिलांनी तुळशीच्या ओटी भरल्या.

एकंदरीत तुळशी विवाह समारंभ थाटात सुरु झाले आहे व काही दिवस चालणार आहे. त्यामुळे मोठ्या दिपावली सणाची सर्वांना प्रतिक्षा असते. तुळशी विवाह झाला की, माणसांचे विवाह समारंभ सुरू होतात आणि जत्रोत्सव सुरू होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT