Court Order, summons  Canva
गोवा

Chandel Hasapur: इकडे अविश्वास ठराव, तिकडे राजीनामा; चांदेल-हसापूरमधील नाट्य, सरपंच तुळशीदास गावस पदमुक्त

Tulshidas Gavas: सरपंच तुळशीदास गावस हे पंचायतीचा कारभार चालविताना पंचायत मंडळाला विश्वासात घेत नाहीत, हे नेहमीचे कारण देण्‍यात आले आहे.

Sameer Panditrao

पेडणे: चांदेल-हसापूर सरपंच तुळशीदास गावस यांच्याविरोधात एकूण पाच पंचसदस्यांपैकी चौघांनी सोमवारी (ता.२३) सकाळी पेडणे गट विकास कार्यलयात अविश्वास ठरावाची नोटीस दिली; तर त्‍याचवेळी गावस यांनी पंचायत संचालनालयाकडे पदाचा राजीनामा सादर केला.

‘अंतर्गत करारानुसार सरपंचपदासाठी अडीच वर्षांचा माझा कालावधी होता. त्यानुसार हा कालावधी संपल्याने मी आज पंचायत संचालनालयाकडे सरपंचपदाचा राजीनामा सादर केला,’ असे गावस यांनी सांगितले. तरीही तुमच्यावर अविश्वास ठराव का दाखल करण्यात आला, या प्रश्‍‍नावर ते उत्तरले- ‘माझ्यावर विश्वास ठराव संमत झाला, हे दाखवण्यासाठी हे राजकारण असावे.’

दरम्‍यान, अविश्‍‍वास ठरावाच्‍या नोटिसीवर रिमा अच्युत मळीक, ऋचिता मळीक, बाळा शेटकर व प्रज्योत मळीक या पंचसदस्यांच्या सह्या आहेत. सरपंच तुळशीदास गावस हे पंचायतीचा कारभार चालविताना पंचायत मंडळाला विश्वासात घेत नाहीत, हे नेहमीचे कारण देण्‍यात आले आहे.

मात्र, आमदार प्रवीण आर्लेकर विरुद्ध सरपंच तुळशीदास गावस यांच्यामधील सुप्‍त संघर्ष हे अविश्वास ठराव नोटिसीमागील खरे कारण असल्‍याचे बोलले जात आहे. तुळशीदास गावस हे पेडणे भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.

यापूर्वी अविश्‍‍वास होता बारगळला

डिसेंबर २०२४मध्ये तुळशीदास गावस यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी बाळा शेटकर हे पंचसदस्य गायब झाले होते व अविश्वास ठराव चर्चेला येण्याच्या वेळी बाउन्सरच्या संरक्षणात ते गाडीतून उतरले असता त्यांना तुळशीदास गावस यांच्या समर्थकांनी ताब्यात घेऊन मतदारांना विश्वासात न घेता आपण परस्पर अविश्वास ठरावाला समर्थन कसे काय दिलात, याचा जाब विचारला होता. त्यावेळी चांदेल-हसापूर पंचायतीसमोर राडा झाला होता. नंतर तुळशीदास गावस यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला ठराव बारगळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT