MLA Ulhas Tuenkar dainik gomantak
गोवा

आमदार तुयेकर यांच्या विजयाने नावेलीला मंत्रिपदाची आशा

नावेलीच्या प्रवेशाने दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे ध्येय भाजपने साध्य केले

दैनिक गोमन्तक

मडगाव : सासष्टी येथील मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार उल्हास तुयेकर (MLA Ulhas Tuenkar) यांच्या रूपाने भाजपला यश मिळाल्याने उत्साह आहे. कॅथलिक (Catholic) असणाऱ्या सासष्टी मतदार संघात भाजपने प्रवेश करावा या दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे ध्येय भाजपने काहीअंशी साध्य केले आहे. (Tuenkar's victory has now fuelled demands for a ministerial berth for the loyal grassroots worker)

भाजपने या वेळी सासष्टी (salcete) मतदार संघातील सर्व 8 मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला असणाऱ्या या मतदार संघात भाजपने आपले पाय रोवण्याच्या प्रयत्न केला होता. तर त्यावेळी भाजपने येथे अपक्षांना किंवा आघाडीच्या घटकांना पाठिंबा दिला होता. मात्र आता येथून पहिल्यांदाच भाजपचा पहिला आमदार म्हणून उल्हास तुयेकर हे निवडून आले आहेत.

तर हा विजय भाजपसाठी महत्वाचा आहेच त्याचबरोबर हे ही महत्वाचे आहे की, आमदार आमचा आहे. जो आमच्या पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे, असे भाजपने सांगितले.

दरम्यान भाजपचे नवनिर्वाचित आमदार (MLA) उल्हास तुयेकर यांनी, आमदार म्हणून निवडून येणे ही मला लॉटरी नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे. त्यामुळे एका सच्चा कार्यकर्त्याला आमदारकीचे तिकीट देण्याचे काम भाजप (BJP) ने केले. तर त्या संधीचे सोने करत मला आमदार जनतेने केले. मी, माझ्या 20 वर्षांच्या कालावधीत मतदारसंघात जे काम केले हे यश त्या बांधिलकीचे हे फळ असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर आता येथे काम करणाऱ्या तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून आमदार तुयेकर यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. आमदार तुयेकर हे नावेलीला (Navelim) मतदारसंघात (Constituency) डार्क हॉर्स ठरले आणि त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी टीएमसीच्या (TMC) वलंका आलेमाओ यांचा 430 मतांनी पराभव केला.

तर येथे भाजपच्या पारंपारिक मतांव्यतिरिक्त आमदार तुयेकर यांच्या वैयक्तिक आवाहनाला मतदारांचे पाठबळ मिळाल्याचे राजकीय (Political) सूत्रांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT