tuberculosis Dainik Gomantak
गोवा

Tuberculosis Death In Goa: धक्कादायक : क्षयरोगी मृत्यूंचे प्रमाण गोव्यामध्ये सर्वाधिक!

सर्वेक्षण : ‘ईएफआय’चे उपाध्यक्ष भारद्वाज यांची माहिती

दैनिक गोमन्तक

Tuberculosis Deaths Are Highest In Goa: गोव्यात क्षयरोगामुळे रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राष्ट्रीय पातळीवर केलेल्या विविध आजारांच्या प्रमाणाचे सर्वेक्षण आरोग्य खात्याने केले आहे, त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

देशात सुमारे ३० टक्के लोक हे मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहेत. या आजाराने इतर आजारांनाही चालना मिळते. मधुमेह कायमस्वरूपी बरा होऊ शकत नाही.

मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, असे मत ‘एपिडेमिओलॉजी फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे (ईएफआय) उपाध्यक्ष डॉ. अशोक भारद्वाज यांनी व्यक्त केले. २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये गोव्यात क्षयरोगाच्या मृत्यूंमध्ये १४३.१ टक्के वाढ झाली आहे.

मद्यपींसाठी वेगळी उपचारपद्धती

गोव्यातील सर्वाधिक क्षयरोगी मृत्यूंच्या प्रमाणासंदर्भात गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, दारू पिणाऱ्या रुग्णांवरील क्षयरोगावर उपचार सुरू असताना औषधांचा परिणाम होत नाही.

त्याच्या शरीरातील यकृत या औषधांना साथ देत नाही. त्यामुळे ही औषधे बंद करावी लागतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या उपचारासाठी वेगळी पद्धत अवलंबावी लागते.

"दारू पिणारा रुग्ण क्षयरोगाने त्रस्त असल्यास त्याला इस्पितळात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले जातात. त्यामुळे त्याला दारूपासून दूर ठेवण्यात येते. उपचारानंतर त्याला घरी पाठवल्यावर कुटुंबीयांनी त्याच्यावर देखरेख ठेवण्याची गरज असते. त्यामुळे २०२५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत."

- डॉ. शिवानंद बांदेकर, डीन, गोमेकॉ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ये अज्ञानी', गोव्याला 'कायदाहीन' म्हणणाऱ्या केजरीवालांना भाजपने दिला दम; Post Viral

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

ED Raid: दुबईत हवालामार्गे गुंतवणूक! संशयावरून ‘ईडी’ची गोवा, दिल्लीत छापेमारी; अनेकजण ताब्यात

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT