Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

'फोंड्याला चांगले ते देण्याचा प्रयत्न'

रवी नाईक यांची ग्वाह: तिसरा जिल्हा निर्मितीसाठी कार्यरत

दैनिक गोमन्तक

फोंडा: आमदार म्हणून फोंडावासीयांना सातत्याने चांगले ते देण्याचा आपला प्रयत्न राहिला असून फोंडा मतदारसंघात झालेली विकासकामे ही फोंडा सर्वच दृष्टीने सरस करण्यासाठी झालेले प्रयत्न असल्याची ग्वाही फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी फोंडा पालिकेचे नगरसेवक रितेश नाईक उपस्थित होते.

रवी नाईक म्हणाले की, फोंडा मतदारसंघात विविध विकास प्रकल्प उभारले. आता तिसरा जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. फोंडा शहरात भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी बावीस कोटी रुपयांचे काम करण्यात येणार आहे. या भूमिगत वीजवाहिन्यांमुळे फोंडा शहर वीजवाहिन्यांच्या जंजाळातून मुक्त होणार आहे.

अंत्रुज महाल हा देवदेवतांचा प्रदेश आहे. त्यामुळे येथील मंदिर पर्यटनाला अधिक चांगला वाव असून या तालुक्यात निसर्गसौंदर्य असल्याने त्याचा लाभ पर्यटनाच्यादृष्टीने होणे शक्य आहे. मंदिर पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारासाठी वाव मिळणे शक्य आहे, त्यामुळे मंदिर पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील भाषावाद असो व कुळ मुंडकार प्रकरण असो किंवा गोवा महाराष्ट्रात जावा की नाही यासंबंधीचा कौल असो, प्रत्येकवेळी आंदोलनातून आपण त्यात भाग घेतला.

जनतेच्या मताशी सहमत झालो, या आंदोलनांमुळेच आपण घडलो आणि जनतेशी संवाद साधू शकलो, असे त्यांनी सांगितले. कृषिमंत्री म्हणून काम करताना राज्यातील कृषी क्षेत्राला अधिक चांगला वाव देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फोंडा पालिकेच्या माध्यमातूनही विकास प्रकल्प साकारणे शक्य असून फोंड्यातील जनतेला अधिक चांगली सेवा देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असून त्यासाठीच तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती गरजेची ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासकामांचा घेतला आढावा

कृषिमंत्री रवी नाईक यांनी फोंडा मतदारसंघातील विकासकामांचा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेतला. फोंड्यातील काही शिल्लक कामे त्वरित पूर्ण करण्याबरोबरच मॉन्सूनपूर्व कामासंबंधीही त्वरित कार्यवाही करण्याची आवश्‍यकता आहे. रवी नाईक यांनी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विकासकामांसंबंधी चर्चा करून त्यांना योग्य सूचना मंत्री रवी नाईक यांनी दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT