गोवा

TMC Goa: तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवा; डेरेक ओब्राईन यांचे गोमंतकीयांना आवाहन

गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सध्या विविध राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेसच्या बंडानंतर (Congress Party Crisis in Goa) विविध राजकीय पक्षांनी गोव्यात बैठका आणि पत्रकार परिषदांचा धडका लावला आहे. आठ काँग्रेस आमदारांच्या प्रवेशामुळे गोव्यात भाजपला हत्तीचे बळ मिळाले आहे. पण, पक्षांतरामुळे राज्यातील विरोधी पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सध्या विविध राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत.

काँग्रेस गोव्यात पक्षाची पुर्नबांधणी करण्याच्या तयारीला लागला आहे. गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी काँग्रेसमधील कचरा बाहेर गेला असून, गोव्यात पक्षाची पुर्नबांधणी केली जाईल असे वक्तव्य केले. त्यातच आता गोवा तृणमूल काँग्रेसने देखील गोव्यात आपले स्थान मजबूत करण्यासाठी काँग्रेस बंड संधी मानत पक्षाला संजीवनी देण्यासाठी कंबर कसली आहे. तृणमूल काँग्रेसचे जेष्ठ नेते डेरेक ओब्राईन (Derek O’Brien) यांनी, 'तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवा, आम्ही पुढील अनेक वर्षे गोव्याची सेवा करण्यासाठी येथे आहोत.' असे आश्वासन दिले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या Trinamool Congress (TMC) पणजी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नेते डेरेक ओब्राईन यांच्यासह गोवा तृणमूल काँग्रेसचे राज्य संयोजक सॉमिल वाळवईकर आणि मारियानो रॉड्रिग्स, सरचिटणीस अविता बांदोडकर आणि मीडिया समन्वयक ट्रोजन डी'मेल्लो उपस्थित होते.

यावोळी डेरेक ओब्राईन म्हणाले, 'गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आम्ही टीएमसीवर विश्वास ठेवा असे म्हणालो होतो. आज एक वर्षानंतर आम्ही तेच म्हणतोय: TMC वर विश्वास ठेवा. आम्ही पुढील अनेक वर्षे गोव्याची सेवा करण्यासाठी येथे आहोत. आमच्या विश्वासार्हतेमुळेच आम्ही आज तेच वचन देऊ शकतो.' असा विश्वास यावेळी डेरेक ओब्राईन यांनी व्यक्त केला.

काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी एकत्र येऊन वैयक्तिक फायद्यासाठी गोव्यातील जनतेला मूर्ख बनवले. असा आरोप डेरेक ओब्राईन यांनी केला. आम्ही तळागाळातून पक्ष संघटना बांधत आहोत, याकडे लक्षपूर्वक पाहून गोवा टीएमसीवर विश्वास ठेवा. असे आवाहन ओब्राईन यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

SCROLL FOR NEXT