Fire at Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळावर अग्नितांडव, 6 ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

दैनिक गोमन्तक

पेडणे : आधीच वादात सापडलेल्या मोपा विमानतळ प्रकल्पामागचं शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. स्थानिकांचा विरोध झुगारुन प्रशासनाने मोपा विमानतळाचं काम सुरुच ठेवलं आहे. आता विमानतळाच्या कामावर असलेल्या जवळपास 6 ट्रक्सना आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळावर (Mopa Airport) सामानाची ने-आण करणाऱ्या जवळपास 6 ट्रकना अचानक आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हे सर्व ट्रक जवळजवळ उभे असल्याने एकेक करत सर्व ट्रकनी आग (Fire) पकडली आणि मोपा विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

दरम्यान मोपा विमानतळावर आग लागल्याची माहिती मिळताच पेडणे (Pernem) आणि म्हापसा अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरु असून कडाक्याच्या उनामुळे आग जास्त भडकल्याचं बोललं जात आहे. आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालं याची माहिती अजून मिळू शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख; 'राजा जानी' ते 'चुपके चुपके'चा प्रोफेसर! धर्मेंद्रच्या निधनाने बॉलिवूडने गमावला एक अष्टपैलू नट

Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

'व्याघ्र प्रकल्प नको' भूमिका चुकीची! खाणींसारखाच हाही गोव्याच्या हिताचा लढा - संपादकीय

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

SCROLL FOR NEXT