Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : दुर्दैवी; अपघातातून बचावला मात्र 'लिफ्ट' बेतली जीवावर!

आगशी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक करुन गुन्हा नोंद केला

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Accident News : माशे येथे रविवारी रात्री 1च्या सुमारास चढावावर ट्रक कलंडला. या अपघातात बचावल्यानंतर चालकाने लिफ्ट घेत कर्नाटककडे रवाना झाला.

मात्र, जाताना त्याने लिफ्ट घेतलेल्या वाहनाचाही कारवार येथे अपघात झाला. दुर्दैव म्हणजे या अपघातात त्या ट्रकचालकाचा मृत्यू झाला.

गोव्याहून कर्नाटककडे कोळसा वाहतूक करणारा ट्रक (क्र. सीजी 15 डीएफ 9816) लोलये-काणकोण आणि माशे जवळील चढावावर गिअर बदलताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक कलंडला. त्याने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला.

मात्र, दुर्दैवाने काही वेळातच काळाने त्याच्यावर घाला घातला. घटनेनंतर चालक लिफ्ट मागून कर्नाटक येथे जात होता.

मात्र, जाताना कारवार येथे त्याच्या गाडीला अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. यासंबंधी कारवार पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी माशे येथील अपघातस्थळाची पाहणी केली.

पादचाऱ्याचा मृत्यू

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळासमोरील सर्व्हिस रस्त्यावर एका भरधाव टिप्परने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका पादचाऱ्याला ठोकर दिल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना रविवारी घडली.

ब्रिजेश यादव (मुळ रा. उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव असून आगशी पोलिसांनी ट्रकचालक संदीप असोलकर याला अटक करून त्याच्याविरुद्ध कलम 304 खाली गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT