चाररस्ता-माशे बगल चारपदरी रस्त्यावरून मालवाहू ट्रक नदीत कोसळला Dainik Gomantak
गोवा

Goa: चाररस्ता-माशे रस्त्यावर मालवाहू ट्रक नदीत कोसळला

ट्रक (truck) फरफरटत रस्त्या द्विभाजकला धक्का देत रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिकेडस मोडून तो खोल नदीच्या पात्रात कोसळला. त्यामुळे ट्रकचे मागील एक्सल तुटून वेगळे झाले.

दैनिक गोमन्तक

काणकोण: चाररस्ता-माशे (Four way) चारपदरी बगल हम रस्त्यावरून (road) मालवाहू ट्रक (truck) नदीत कोसळण्याची (fall into the river) घटना रविवारी उत्तररात्री घडली. केए ०२ ए एफ २९६९ हा मालवाहू ट्रक मडगावहून कारवारच्या दिशेने जात होता.चारपदरी हमरस्त्यावरील तळपण पुलाच्या अलिकडे ट्रकचा टायर फुटला त्यामुळे ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रक फरफरटत रस्त्या द्विभाजकला धक्का देत रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिकेडस मोडून तो खोल नदीच्या पात्रात कोसळला. त्यामुळे ट्रकचे मागील एक्सल तुटून वेगळे झाले.

या अपघातात ट्रकचा क्लिनर जखमी झाला असून काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मडगाव येथील हॉस्पिसियू इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ट्रकचा चालक सिन्नप्पा किरकोळ जखमी झाल्याचे पोलिस तपास अधिकारी हवालदार नितीन देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT