suicide case in valpoi  Dainik Gomantak
गोवा

भयभीत होऊन 'त्या' ट्रकचालकाने केली आत्महत्या

काजू बागायतीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

दैनिक गोमन्तक

वाळपई : पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील शिंगणे येथे एका ट्रकचालकाने आत्महत्या केली आहे. गुरुदास परब (वय 52) असे त्यांचे नाव आहे. आपल्या हातून दुचाकीस्वाराचा अपघात (Accident) झाल्याने त्यांनी भयभीत होऊन टोकाचे पाऊल उचलले असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनूसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान वांते सत्तरी येथे ट्रकचालक गुरुदास परब हे ट्रक घेऊन व्यवसायासाठी जात होता.

वांते येथे एका ठिकाणी समोरून दुचाकीस्वार नंदा गावकर (रा.वांते) ट्रक खाली आला. त्यात नंदा गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला लोकांच्या मदतीने गोमेकॉत हलविण्यात आले. मात्र, घटनेत दुचाकीस्वारासोबत काही अघटीत घडले असावे या भीतीने परब घाबरले व घटनास्थळावरून गायब झाले. त्यांचा शोध सुरू होता. पण आज शनिवारी सकाळी ते शिंगणे येथे घरापासून परिसरात असलेल्या काजू बागायतीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

वाळपई (valpoi) पोलिसांनी (police) पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. दरम्यान, अपघातग्रस्त नंदा गावकर गंभीर असून शस्त्रक्रिया करून आयसीयुत दाखल करण्यात आले आहे. ट्रकचालकाने अपघाता नंतर भयभीत होऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT