Truck Accident in Chorla Ghat  Dainik Gomantak
गोवा

हॉटमिक्सिंग वाहून नेणाऱ्या ट्रकचा चोर्ला घाटात अपघात

Accident in Chorla Ghat : या घटनेत वाहनचालक जखमी झाला असून त्याला GMC मध्ये दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

दत्तवाडी-साखळी ते चोर्ला घाट गोव्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्ती आणि हॉटमिक्सिंगच्या कामासाठी हा मार्ग 4 मे ते 11 मे या कालावधीत अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार होता. मात्र या कामासाठीच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. (Truck carrying hotmixing crashed in Chorla Ghat)

चोर्ला घाटात जिथे रस्त्याचे काम सुरू आहे त्यासाठी हॉटमिक्सिंग वाहून नेत असलेल्या ट्रकचा मोर्ले सत्तरी येथे ट्रक उलटल्याने अपघात घडला आहे. ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत वाहनचालक जखमी झाला असून त्याला GMC मध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, दुरुस्ती आणि हॉटमिक्सिंगच्या कामासाठी हा मार्ग 4 मे ते 11 मे या कालावधीत अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत गोव्यातून चोर्लामार्गे कर्नाटकमध्ये जाणारी सर्व अवजड वाहने अनमोड घाटामार्गे वळवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT