Truck Accident in Karmal Ghat Dainik Gomantak
गोवा

करमल घाटात उलटलेल्या ट्रकवर मालवाहू ट्रक कलंडला

गुळे येथे मंगळरूहून डिचोलीला माल घेऊन जाणारा एक मालवाहू ट्रक एका लक्झरी बसला बाजू देताना आठ दिवसांपूर्वी उलटलेल्या ट्रकवर कोसळला.

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोण ते बाळ्ळी पर्यंतच्या हमरस्त्यावर करमलघाटात अरूंद रस्त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे. बुधवारी या रस्त्यावर गुळे येथे मंगळरूहून डिचोलीला माल घेऊन जाणारा एक मालवाहू ट्रक एका लक्झरी बसला बाजू देताना आठ दिवसांपूर्वी उलटलेल्या ट्रकवर कोसळला.

आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक ट्रक उलटला होता. मात्र हा ट्रक अजूनही काढण्यात आलेला नाही. आधीचा ट्रक काढण्यासाठी पन्नास हजार रुपयांचा खर्च येणार आहे, त्यामुळे मालक पैशांची जमवाजमव करीत असल्याची माहिती आहे. त्यातच आणखी एक ट्रक आधीच कोसळलेल्या ट्रकवर पडल्याने आता अडचणींमध्ये भरच पडली आहे.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये करमल घाटात एका कंटेनरचा असाच अपघात झाला होता. हा कंटेनर दोन मीटर खोल दरीत कोसळला होता. यावेळी कंटेनर काढताना मडगाव-काणकोण हमरस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.

करमल घाटात मडगाव-कारवार हमरस्त्यावर पिसोणे येथे मडगावहून कारवारच्या दिशेने येणारा कंटेनर दोन मीटर खोल दरीत कोसळला होता. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्यटकांच्या फटाक्यांमुळे मच्छिमाराचे 'रापण' खाक; मोठ्या आर्थिक नुकसानानंतर भरपाईची मागणी!

Goa Crime: कळंगुट हादरलं! 15 वर्षांपासून काम करणाऱ्या केअरटेकरची फावड्याने वार करुन निर्घुण हत्या; संशयित पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांच्या रमाने 50 सेकंदात पूर्ण केले 8 श्लोक; गोव्याची चिमुकली बनली 'ग्रँडमास्टर'! 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव

बेबी एबी अन् रदरफोर्डचं तूफान! सलग 6 चेंडूंवर ठोकले 6 षटकार, मुंबई इंडियन्सची उडवली दाणादाण; 11 वेळा चेंडू गेला मैदानाबाहेर VIDEO

Vijay Hazare Trophy: मुंबईचा विजयी चौकार; गोवा संघाचा 87 धावांनी पराभव, अभिनव तेजराणाची शतकी खेळी व्यर्थ

SCROLL FOR NEXT