Anmod Ghat Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: अनमोड घाटात वाहतूक ठप्प! संरक्षक कठड्याला धडकला ट्रक; रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा

Anmod Ghat Traffic Jam: अनमोड घाटात रामनगर येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बारा चाकी ट्रकचा पाटा तुटल्याने येथील वळणावर असणाऱ्या संरक्षक कठड्याला धडकून ट्रक वळणावरच अडकून पडला. परिणामी वाहतूक ठप्प झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Anmod Ghat Traffic Jam Due To Truck Accident

रामनगर: अनमोड आरटीओ चेकपोस्ट पासून दोन किमी. अंतरावर असणाऱ्या अनमोड घाटात रामनगर येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बारा चाकी ट्रकचा पाटा तुटल्याने येथील वळणावर असणाऱ्या संरक्षक कठड्याला धडकून ट्रक वळणावरच अडकून पडला. परिणामी वाहतूक ठप्प झाली.

वाहतूक सायंकाळी ५.३० वाजल्यापासून पूर्णतः कोलमडली. त्यामुळे दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागून राहिल्या असून रात्री दहा नंतर हळूवार चार चाकी वाहनांना सोडण्यात आले, तर रात्री उशिरापर्यंत सदर ट्रक शेजारी हटवण्यासाठी क्रेन न आल्याने मोठी वाहणे मात्र अडकून पडली होती.

तर सदर वळणावर रस्त्यालगतच संरक्षक भिंत घातल्याने अनेकदा अवजड वाहनांना वळण बसत नसल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छोटी वाहने सोडून काही प्रमाणात वाहतूक कोंडी सोडवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT