Aleixo Reginaldo lourenco

 

Dainik Gomantak

गोवा

तृणमुल काँग्रेस हेच गोव्याचं भवितव्य : रेजिनाल्ड

तृणमुल हेच गोव्याचे आगामी भवितव्य आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्ष सोडून तृणमुलमध्ये दाखल झालेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo lourenco) यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: भाजपशी (BJP) लढा देण्याची धमक आता गोव्यातील काँग्रेसमध्ये राहिलेली नाही. अशा परिस्थतीत भाजपला शिंगावर घ्यायचे असल्यास तृणमुल काँग्रेस (Trinamool Congress) हा एकमेव पक्ष आहे. तृणमुल हेच गोव्याचे आगामी भवितव्य आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्ष सोडून तृणमुलमध्ये दाखल झालेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo lourenco) यांनी व्यक्त केली.

लॉरेन्स हे आज कोलकात्यात तृणमुल पक्षात सामील झाले. मगोचे नेते सुदिन ढवळीकर (MGP Sudin Dhavalikar) यांच्याबरोबर त्यांनी आज तृणमुलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची भेटही घेतली.

आपण तृणमुलमध्ये का प्रवेश केला याबद्दल खुलासा करणारा एक व्हिडीओ रेजिनाल्ड यांनी प्रसारित केला असून भाजपला गोव्यात केवळ तृणमुलच टक्कर देऊ शकते हे या पक्षाने अवघ्या तीन महिन्यात दाखवून दिले आहे. त्यामुळेच फक्त हा पक्षच भाजपला शिंगावर घेऊ शकतो याची खात्री मला पटली त्यामुळेच मी या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.

2012 पासून मी भाजपला विरोध करत आलो आहे. त्यामुळे मला विरोधी पक्षात राहावे लागले. त्याचा फटका माझ्या मतदारांना आणि मतदारसंघाला बसला. विरोधात असल्यामुळे हवी तशी विकासकामे झाली नाहीत. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्ताधारी पक्षात येण्याची गरज आहे. अवघ्या तीन महिन्यात तृणमुल पक्षाने गोव्यात जी मुसंडी मारली आहे. ते पाहता हा पक्ष गोव्यात सत्तेवर येईल ही खात्री वाटते असे ते म्हणाले.

गोव्यातील काँग्रेस पक्ष सध्या सुकाणू नसलेले तारू झाले आहे. या पक्षाकडे काहीच कार्यक्रम नाही. मला प्रदेश समितीचा कार्याध्यक्ष केले गेले मात्र तुमचे प्रचाराचे मुद्दे कुठले असे नेत्यांना विचारले की त्यांच्याकडे उत्तर नासायचे. गोवा फॉरवर्ड बरोबर युती करण्याचा निर्णय झाला. मात्र मला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले. तिथे कुणाचा ताळतंत्र कुणाला नव्हते अशी एकंदर स्थिती असल्याचे रेजिनाल्ड म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT