former japanese pm Shinzo Abe Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारकडून शिंजो आबेंना श्रध्दांजली, एक दिवसाचा दुखवटा जाहीर

राज्य पातळीवर गोवा सरकारने शनिवारी एक दिवसाचा दुखवटा‌ जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Former Japanese Pm Shinzo Abe: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवारी एका कार्यक्रमात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी पोलिस सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने अनेक दिवसांपासून याची योजना आखली होती. त्याच्याकडून स्फोटकांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे. हल्लेखोराने शिंजो आबे यांच्यावर गोळ्या का झाडल्या हेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, जगभरातून आबे यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात आहे. यातच भारत सरकारने शिंजो आबे यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर राज्य पातळीवर गोवा सरकारने शनिवारी एक दिवसाचा दुखवटा‌ जाहीर केला आहे.

पंतप्रधान मोदींचे ट्विट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि शिंजो आबे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आबे यांच्यावरील हल्ल्यानंतर पीएम मोदींनी ट्विट(Tweet) केले. ट्वीटमध्ये म्हटले की, “माझे प्रिय मित्र आबे शिंजो यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे खूप दुःख झाले आहे. आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांचे कुटुंबीय आणि जपानी लोकांसोबत आहेत."

दरम्यान, शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याबाबत ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) म्हणाले की, "माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना गोळ्या घालण्यात आल्या... ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि जपानी लोकांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो."

तसेच, शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला आहे. "शिंजो आबे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने धक्का बसला. त्यांच्या हितचिंतक आणि कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत," असे जॉन्सन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT