Former Japanese Pm Shinzo Abe: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवारी एका कार्यक्रमात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी पोलिस सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, अबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने अनेक दिवसांपासून याची योजना आखली होती. त्याच्याकडून स्फोटकांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे. हल्लेखोराने शिंजो आबे यांना गोळी का मारली हेही समोर आले आहे. (Why Former Japanese Pm Shinzo Abe Killed Man Who Attacked Abe Was Dissatisfied)
पोलिस (Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आबे यांच्यावर हल्ला करणारा तेत्सुया यामागामी त्यांच्यावर "असंतुष्ट" होता. आबे यांची त्याला हत्या करायची होती. दुसरीकडे, अबेंचा मारेकरी, जपानी मॅरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्सचा पूर्व सदस्य आहे. ज्या बंदूकीने आबेंची हत्या केली ती बंदूक मारेकऱ्याने स्वत: हा तयार केली होती. अधिका-यांनी सांगितले की, शूटरच्या घरी स्फोटके सापडली आहेत.
दरम्यान, 67 वर्षीय अबे यांनी शुक्रवारी पश्चिमी जपानमधील (Japan) नारा शहारात भाषण सुरु केल्यानंतर काही मिनिटांतच मागून त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. आबे यांना एअरलिफ्ट करुन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तेवढ्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दुसरीकडे, पोलिसांनी हल्लेखोर तेत्सुया यामागामी याला घटनास्थळावरुन पकडले. मात्र, पोलिसांनी हल्लेखोराबाबत अधिक माहिती दिलेली नाही. परंतु जपानी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, संशयिताने 2005 पर्यंत सैन्यात तीन वर्षे घालवली होती.
शिवाय, पोलिसांच्या हवाल्याने जपानी माध्यमांनी म्हटले आहे की, बंदूकधारी व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केला आहे. यावेळी त्याने म्हटले की, मी अबे यांना मारण्याचा प्रयत्न केला कारण मी "असंतुष्ट" होतो.
तथापि, दुसर्या जपानी मीडियाच्या अहवालात असे म्हटले आहे की, शूटरने पोलिसांना सांगितले की, 'आबे यांच्या राजकीय विचारसरणीविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.