Govind Gawade Dainik Gomantak
गोवा

आदिवासी कल्याण खात्‍याचा कार्यभार मंत्री गावडे यांच्‍याकडे द्यावा : प्रकाश वेळीप

कला व संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे यांनी गेल्‍या कार्यकाळात आदिवासी खात्‍याचा कारभार चांगल्‍या पद्धतीने सांभाळला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी : कला व संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे यांनी गेल्‍या कार्यकाळात आदिवासी खात्‍याचा कारभार चांगल्‍या पद्धतीने सांभाळला होता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदिवासी कल्याण खात्‍याचा कार्यभार मंत्री गावडे यांच्‍याकडे द्यावा, अशी मागणी युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्‍स (‘उटा’)चे प्रकाश वेळीप यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी संघटनेचे सतीश वेळीप आणि इतर पदाधिकारी उपस्‍थित होते. (Tribal Welfare Department should be handed over to Minister Gawde Prakash Velip said)

मंत्री गावडे यांनी यापूर्वी आदिवासी कल्याण मंत्री म्‍हणून कामकाज पाहिले आहे. त्‍यांच्‍या कार्यकाळात समाजाचे काही प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागले. म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्री गावडे यांच्‍याकडे आदिवासी खाते सोपवावे, अशी मागणीही यावेळी त्‍यांनी केली.

25 रोजी प्रेरणा दिन सोहळा

‘उटा’तर्फे 25 मे हा 'प्रेरणा दिन' म्‍हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, आमदार गणेश गावकर उपस्‍थित राहणार आहेत,असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT