Tribal Reservation Bill Goa X
गोवा

Tribal Reservation Bill : आदिवासी विधेयक अद्याप ‘जैसे थे’; अर्थसंकल्पीय अधिवेशनाची करावी लागणार प्रतीक्षा

Goa News: राज्यातील आदिवासी आरक्षणासाठी आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Scheduled Tribe reservation bill in Goa

पणजी: राज्यातील आदिवासी आरक्षणासाठी आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे आज स्पष्ट झाले. लोकसभेत गेले दोन दिवस कॉंग्रेसच्या खासदारांनी कामकाज करू न दिल्याने हे विधेयक काल आणि आज चर्चेला येऊच शकले नाही. मंगळवारी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासह १२ खासदारांनी या विधेयकावर लोकसभेत चर्चा केली होती.

राज्याच्या विधानसभेत १० टक्के आरक्षण मिळावे, अशी गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाची मागणी आहे. राज्य सरकारने त्‍यांना २०२७ च्या विधानसभा निवडणुकीआधी राजकीय आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. लोकसभेत सादर केलेल्या गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्स्थापन करण्यासंबंधीचे गोवा विधेयक, २०२४ वर विचार करून मंजुरीचा विचार कऱण्याचा प्रस्ताव केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सादर केला होता.

त्यावर पहिल्याच दिवशी चर्चा झाली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करून कॉंग्रेसचे खासदार आक्रमक होऊन त्यांनी कामकाज रोखून धरल्याने या विधेयकावर चर्चा झाली नाही. उद्या लोकसभा अधिवेशनाच्या शेवटचा दिवस आहे. त्यातच शुक्रवार हा खासगी कामकाजाचा दिवस असल्याने हे विधेयक चर्चेला येण्याची शक्यता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT