Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'आजही ती गोव्यात झालेल्या आत्याचाराच्या यातना भोगतेय', पीडित तरुणीच्या वडिलांचे डच दूतावासाला पत्र

Goa Crime News: गेल्या वर्षी गोव्यातील रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर विदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Manish Jadhav

गेल्या वर्षी गोव्यातील रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर विदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार आणि हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. यातच आता, 30 वर्षीय पीडित डच महिलेच्या कुटुंबाने मुंबईतील नेदरलँड्सच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. तसेच, कोर्टात सुरु असलेल्या ट्रायलला गती देण्यासाठी आणि भारत सरकारकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

दरम्यान, तरुणीच्या वडिलांनी मुंबईतील किंगडम ऑफ नेदरलँड्सचे कौन्सुल जनरल बार्ट डी जोंग यांना एक ईमेल लिहून सध्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीविरुद्धचा खटला “अत्यंत संथ गतीने चालला” असल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते आपल्या पत्रात म्हणाले की, ''माझी मुलगी अजूनही या हल्ल्यातून सावरलेली नाहीये. दुसरीकडे मात्र आरोपीला अद्याप दोषी ठरवले गेलेले नाही.''

त्यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की, 'एका भारतीय व्यक्तीने माझ्या मुलीसोबत अमानुष कृत्य केले. एक वर्षापूर्वी आरोपीला ताब्यात घेण्यात आले, परंतु दोन महिन्यांनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.'

''दरम्यान, आरोपी अजूनही मोकळा आहे. आम्ही हेही ऐकले की तो कुठेतरी काम करत आहे, जिथे तो असाच गुन्हा करु शकतो… आम्हाला वाटते की आम्ही भारतात नसल्यामुळे या खटल्यालाच पुरेसे प्राधान्य दिले जात नाहीये. आम्ही भारत सरकारला या प्रकरणात इतका कालावधी का लागत आहे याचे कारण विचारण्यात आणि ट्रायलला गती देण्यासाठी विनंती करतो,” असेही त्यांनी आपल्या पत्रात लिहिले.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ते म्हणाले की, “या घटनेपासून माझी मुलगी मानसिक आघाताने त्रस्त आहे आणि तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिला नीट झोपही लागत नाही. जेव्हा ती आरशात पाहते तेव्हा तिला तिच्या अंगावरच्या जखमा दिसतात किंवा स्वयंपाकघरात चाकू दिसला की ती घाबरुन जाते. ती आठवड्यातून फक्त काही दिवस काम करु शकते. सुरुवातीला तिला बाहेर जायलाही भीती वाटत होती. तिची मुख्य चिंता ही आहे की आरोपीची सुटका होईल.”

पीडितेच्या वडिलांना दिलेल्या उत्तरात कॉन्सुल जनरल बार्ट डी जोंग यांनी 2 जुलै रोजी लिहिले की, “तुमच्या प्रकरणात कोणतीही प्रगती न दिसणे तुमच्या मुलीसाठी आणि तुमच्यासाठी खूप निराशाजनक असेल. भारतात कायद्याचे राज्य असले तरी येथील न्याय प्रक्रिया खूप संथ आहे.''

कॉन्सुल जनरल पुढे म्हणाले की, “या प्रकरणाचा कसा लवकरात लवकर निपटारा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करु. तसेच आमच्याकडे कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर आम्ही तुमच्याशी शेअर करु.”

इंडियन एक्स्प्रेसने बार्ट डी जोंग यांच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधला की, त्यांनी या विषयावर भारत सरकारशी संपर्क साधला आहे, परंतु त्यांना अद्याप काहीही प्रतिसाद मिळालेला नाहीये.

पीडित तरुणी 28 मार्च 2023 रोजी योग रिट्रीटसाठी गोव्यात आली होती. ती एका रिसॉर्टच्या परिसरात टेंट थांबली होती. त्याचदरम्यान बारटेंडर-कम-वेटरचे काम करणाऱ्या 28 वर्षीय आरोपीने तिच्या टेंटमध्ये घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर आरोपीने तिच्या पोटात आणि पाठीवर चाकूने अनेक वार केले. पीडितेचा आवाज ऐकून एक व्यक्ती तिच्या मदतीसाठी पोहोचला असता त्याच्यावरही आरोपीने हल्ला केला.

गोवा पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत तात्काळ दुसऱ्या दिवशी आरोपीला अटक केली होती, जो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. त्यानंतर पीडित तरुणीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आठवड्याच्या आता तिला डिस्चार्ज देण्यात आला होता. विशेष म्हणजे राज्याचे पर्यटनमंत्री रोहण खवंटे यांनी तात्काळ ज्या रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये राज्याबाहेरील लोक काम करतात त्यांची पोलीस चौकशी करण्यात येईल असे सांगितले होते.

गोवा पोलिसांनी गेल्या वर्षी जूनमध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपीवर 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर प्राणघातक हल्ला) यासह अनेक आयपीसी कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र,16 सप्टेंबर 2023 रोजी सत्र न्यायालयाने आरोपीची जामिनावर सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

Goa Accidents: गोव्यात रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे दिव्य ठरत आहे; अपघातांचे प्रमाण आणि रस्ता सुरक्षा सप्ताह

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

SCROLL FOR NEXT