Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Goa Crime: राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने आपल्या मुलासंह जीवन संपवण्यासारखे मोठे पाऊल उचलले.
Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न
Goa CrimeDainik Gomantk

राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने आपल्या मुलासंह जीवन संपवण्यासारखे मोठे पाऊल उचलले. कौटुंबिक वादातून महिलेने हे पाऊल उचलल्याचे बोलले जातेय. महिलेने आपल्या 3 आणि 5 वर्षांच्या मुलांना फिनाईल पाजले. आंगावर काटा आणणारी ही घटना आराडी, सुकूर-पर्वरी येथे घडली. मुलांवर सध्या गोमॅकोमध्ये उपचार सुरु आहेत तर पर्वरीतील खाजगी रुग्णालयात आईवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आराडी, सुकूर पर्वरी येथे ही सोमवारी 1 वाजता घडल्याची माहिती आहे. हदिमनी कुटुंब मूळचे गदग, कर्नाटक येथील आहे. सध्या हे कुटुंब आराडी, सुकूर येथे राहत होते. सोमवारी 11.30 च्या सुमारास महिला स्वत: पहिल्यांदा फिनाईल प्यायली आणि नंतर आपल्या पोटच्या मुलांना ते सेवन करण्यास दिले.

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न
Goa Crime: जेवण देतो, असं सांगत 16 वर्षांच्या मुलीला फ्लॅटवर नेलं; 58 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार

घटनेनंतर तिघांचीही प्रकृती खलावली. जेव्हा ती महिला भानावर आली तेव्हा आपल्याकडून मोठी चूक झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर घाबरलेल्या आवस्थेत तिने आपल्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना फोन करुन घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नवऱ्याने आणि तिच्या नातेवाईकांनी घरी धाव घेतली.

दुसरीकडे, त्यावेळी महिलेसह तिच्या दोन्ही मुलांची अवस्था गंभीर होती. तिला तात्काळ पर्वरीमधील खाजगी रुग्णालयात (Hospital) दाखल केले. तिथून दोन्ही मुलांना तात्काळ गोमॅकोमध्ये हालवण्यात आले. या दोन्ही मुलांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर संशयित महिलेवर त्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न
Goa Crime: गोव्यात फसवणुकीचा नवा फंडा! बँक खाती 'Rent' वर घेऊन तरुणांना गंडा, अवघ्या 1 हजारांचं कमिशन भोवलं

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच, महिलेचा नवरा शिवनगौडा हदिमनी याच्या तक्रारीनुसार महिलेवर अल्पवयीन मुलांना फिनाईल पाजून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 108 आणि गोवा बाल हक्क कायदा कलम 8 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला.

दरम्यान, महिलेने (Women) रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे सांगितले जातेय. या महिलेचे आर्थिकदृष्ट्या सधन आहे. हदिमनी कुटुंबातील वादामुळे या महिलेला आपला राग अनावर झाला आणि तिने आपल्या मुलांसह जीवन संपवण्यासाठी फिनाईल प्राशन केले. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक लॉरेन सिक्वेरा पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com