Goa Crime News: कोलवाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; दोन अल्पवयीन मुलींची १२ तासांत सुटका

Goa Police: कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांची कामगिरी
Goa Police: कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांची कामगिरी
Goa police canava
Published on
Updated on

थिवी येथील एका चाईल्ड केअर होममधून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. कोणतेही धागेदोरे नसलेल्या या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत उलगडा केल्याने कोलवाळ पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

माडेल-थिवी येथील एका चाईल्ड केअर होममधील १३ आणि १४ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार कोलवाळ पोलिस स्थानकात नोंदविली होती. या शोध मोहिमेत उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक विजय राणे, उपनिरीक्षक भारत खरात, यशिका सांकवाळकर, निखिल नाईक, प्रवीण पाटील आणि स्वनिका बुडे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

Goa Police: कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांची कामगिरी
Thivim News - थिवी येथे पाण्याची पाईपलाईन फुटली | Gomantak TV

म्हापशातून पीडित मुलींना घेतले ताब्यात

याप्रकरणी पोलिसांनी भान्यासं कलम १३७(१) तसेच गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अन्वये शुक्रवारी गुन्हा नोंदवून तपास चक्रे गतिमान केली. यावेळी विविध पोलिसांची पथके तयार करून अपहृत मुलींचा शोध घेण्यास सुरवात केली. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या मुलींची म्हापशातून सुटका केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com