Trees Dainik Gomantak
गोवा

म्हापशात वाहनधारकांना धोका निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी कधी होणार?

Akash Umesh Khandke

म्हापसा: धोकादायक अवस्थेत असलेली झाडे म्हापसा नगरपालिकेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास काही आठवडे शिल्लक असताना, प्रशासनाने वाहनधारकांना धोका निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी अजूनही सुरू केलेली नाही. (trees that pose a threat to vehicle owners in Mapusa goa should be cut)

गोव्यात शनिवारी जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे विजेच्या तारा तुटल्या. परिणामी काही भागातील लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

पूर्वी म्हापसा येथील रहिवाशांना घरांवर झाडे पडणे, विजेच्या तारा तुटणे यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. नागरी सभापती शुभांगी वायगनकर यांनी विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यांच्यासमवेत संयुक्त पाहणी करून धोका निर्माण करणाऱ्या झाडांची यादी केली आहे. 32 झाडांची यादी तयार होऊन सात महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी झाडांवर अद्याप कुऱ्हाड चाललेली नाही.

म्हापसा (Mapusa) आमदार जोशुआ डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीमध्येही याबाबत व्यक्त करण्यात आली होती आणि आमदारांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना अशा झाडांचे सर्वेक्षण करून तोडण्यास सांगितले होते.

म्हापसा नगरपरिषदेचे अध्यक्ष वायगणकर म्हणाले, “आम्ही धोकादायक झाडांचा (Trees) प्रश्न उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे मांडला होता आणि त्यांना ओळखून तोडण्यास सांगितले होते, मात्र कार्यालयाकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT