गोव्यातील काजू उत्पादकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा

यावर्षी काजूचे उत्पादन खूपच कमी झाले आहे: शेतकरी
Cashew
Cashew Dainik Gomantak
Published on
Updated on

केपे: केपे आणि सांगे परिसरात मागच्या तुलनेत या हंगामात काजूचे उत्पादन कमी झाल्याने काजू उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. याबाबत बर्‍याच शेतकऱ्यांनी तक्रार केली. केपे आणि सांगे भागातील काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्धेही काजू उत्पादन घेतलेले नाही. (cashew farmers expecting aid from goa government)

Cashew
प्रवाशांची गैरसोय, प्रकरण निकाली काढण्याचं आरोलकरांच आश्वासन

एका शेतकऱ्याने आपली खंत व्यक्त केली , “यावर्षी काजूचे उत्पादन खूपच कमी झाले आहे. त्याच बरोबर काजूच्या बियांना योग्य दरही मिळत नाही.आम्ही हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आता जर पाऊस (Rain) पडला तर त्याचा पीक उत्पादनावर परिणाम होईल.”

Cashew
Goa Beach : गोव्याचे किनारे पर्यटकांनी फुलले!

सांगे येथील आणखी एक शेतकरी (Farmer) म्हणाले, "यावर्षी काजूचे फारसे उत्पादन नाही. आम्हाला जे काही काजूचे उत्पन्न मिळाले आहे त्यावरही हवामान बदलामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात पाऊस पडण्याची भीती आहे ज्यामुळे उत्पादनाचे आणखी नुकसान होईल."

अशा कठीण काळात काजू उत्पादकांना सरकारची साथ हवी, असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.
"सरकारने काजू उत्पादकांना दर वाढवण्यासाठी मदत करावी," असे शेतकरी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com