Bicholim IDC Dainik Gomantak
गोवा

Bicholim IDC: ‘आयडीसी’ रस्त्यावरील झाडे धोकादायक

Bicholim IDC: कोसळण्याचा धोका : फांद्यांची छाटणी करण्याची वाहनचालकांची मागणी

दैनिक गोमन्तक

Bicholim IDC: डिचोली येथील औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या बाजूची झाडे जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असून या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे. ''आयडीसी'' मधील रस्त्यांच्या बाजूने असलेली झाडे जीर्ण झाली आहेत. काही झाडे उन्मळलेल्या अवस्थेत आहेत. तर काही झाडांच्या फ़ांद्या रस्त्यावर झुकलेल्या आहेत.

या झाडांमुळे धोका संभवत आहे. ''आयडीसी'' मधील रस्त्यावर कामगार आणि वाहनांची कायम वर्दळ असते. अशावेळी एखादे झाड कोसळले, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. हा संभाव्य धोका ओळखून आयडीसी महामंडळाने धोकादायक झाडांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी कामगार आणि माल वाहतूकदारांकडून होत आहे.

आयडीसी परिसरातील रस्त्याच्या बाजूने उभी असलेली झाडे पन्नास वर्षांपुर्वीची आहेत. यातील बहूतेक झाडे धोकादायक अवस्थेत आहेत. या झाडांपासून धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनर्थ टाळण्यासाठी आयडीसीमधील अत्यंत धोकादायक असलेल्या झाडांची छाटणी करण्याची गरज आहे.
- आशिष शेट गोवेकर, स्थानिक.

वाहतुकीस अडथळा

रस्त्यावर आडव्या असलेल्या झाडाच्या फांद्यामुळे ''आयडीसी''मधील रस्ता वाहतुकीस असुरक्षित बनला आहे. माल वाहतूक करणाऱ्या कंटेनर आदी अवजड वाहनांची नियमितपणे आयडीसीत ये-जा चालू असते. मात्र रस्त्यावर आडव्या झालेल्या फांद्यांमुळे या वाहनांना अडथळा निर्माण होत असतो. पूर्वी कंटेनर झाडाच्या फांदीला अडकून पडला होता. अखेर जेसीबी यंत्र आणून हा कंटेनर बाजूला करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT