Goa Sattari Tree Collapses  Dainik Gomantak
गोवा

Sattari News: वादळी वाऱ्यामुळे सत्तरीत झाडे कोसळली; घरातील मालमत्तचे नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरी तालुक्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून पडली. अडवई-वांते रस्त्यावरील सातेरी मंदिराजवळ सकाळी ७ वाजता फणसाचे झाड पडून वीजवाहिन्या तुटून पडल्या. वाळपई अग्निशमनचे सबऑफिसर श्रीकांत गावकर, चालक आदम खान, फायर फायटर उमेश गावकर, आनंद शेटकर आदींनी अडवई--वांते येथे जाऊन रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

दुसऱ्या घटनेत सकाळी ११.२५ वा. पाली गावातील गोकुळदास गावकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून तीस हजारांचे नुकसान झाले. त्यात साठ हजारांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. त्यावेळी अरविंद देसाई, तुळशीदास झर्मेकर, सतीश नाईक, गंगाराम पावणे, कालिदास गावकर यांनी मदतकार्य केले.

कोपार्डे येथे क्रीडा मैदानाजवळ अमित सावंत यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून पाच हजारांचे नुकसान झाले आहे. त्यात दहा हजारांची मालमत्ता वाचविली आहे. अग्निशमन दलाचे साईनाथ सावंत, बाबुराव गावस, प्रतेश गावकर यांनी मदतकार्य केले. ब्रह्माकरमळी येथे मंदिराजवळ जंगली झाड वीजवाहिन्यांवर कोसळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT