Trees fell at Quepem Dainik Gomantak
गोवा

Quepem: हॉटेलवर कोसळले झाड; दोन लाख रुपयांचे नुकसान

Tree collapses At Quepem: केपेत बऱ्याच ठिकाणी झाडे मोडून पडल्याने लोकांचे नुकसान झाले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: राज्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत असून केपेत बऱ्याच ठिकाणी झाडे मोडून पडल्याने लोकांचे नुकसान झाले आहे. २९ जुलै रोजी मध्यरात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे श्री रामनाथ दामोदर देवस्थानजवळ पिंपळाचे झाड पडल्याने एका हॉटेलचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर झाड रात्रीच्‍यावेळी पडल्याने मोठी हानी टळली. सदर झाड मुदत अग्निशामक दलाने बाजूला काढले.

जांबावली येथे देवस्थानजवळ पिंपळाचे झाड अर्ध्यावर मोडून पडल्याने देवस्थानजवळ जाणारा एका बाजूचा रस्ता बंद होता.

सदर झाडाच्या फांद्या बऱ्याच लांब असल्याने झाडाजवळच असलेल्या एका हॉटेलवर फांद्या पडल्याने या हॉटेलचे छप्पर व आतील सामानाची मोडतोड झाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कुडचडे अग्निशामक दलाचे निरीक्षक दामोदर जांबावलीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cylinder Scheme: '3 सिलिंडर' योजनेचा 50 हजार महिलांना लाभ, दीड लाख अर्ज; 40 हजार अर्ज पतींच्या नावाने, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Goa Onion Price: कांदा पुन्हा रडवू लागला! पणजी बाजारात किलोमागे 70 रुपये, फलोत्पादन महामंडळाकडून 58 रुपयांत विक्री

Team India World Record: टीम इंडियाचा 'भीमपराक्रम'! टी-20 क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत ठरला जगातील पहिलाच संघ; रोमहर्षक सामन्यात जपानचा पराभव

Kunal Thakur Success Story: दिव्यांगत्वावर मात करत कुणाल ठाकूर बनले पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी; शिक्षणासह समाजकार्यातही उमटवला ठसा

Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT