Vishwajit Rane On Eco Tourism In Goa: गोवा हे पर्यटनासाठीचे देशविदेशातील पर्यटकांचे आवडीचे डेस्टिनेशन आहे. टुरिस्ट डेस्टिनेशन ही गोव्याची ओळख आणखी दृढ व्हावी, यासाठी राज्य सरकार सतत विविध प्रयत्न करत असते, उपक्रम राबवत असते.
त्यामध्ये राज्याचा पर्यटन विभाग आघाडीवर असतोच. पण आता वन विभागानेदेखील यात पुढाकार घेतला आहे.
गोव्यात आता ट्री हाऊस, रस्टिक टेंट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना जंगल सफारी, जंगलात राहण्याचा, वन पर्यटनाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. राज्याचे वन मंत्री विश्वजीत राणे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून ही माहिती दिली आहे.
जंगल पर्यटन आणि जंगल संवर्धनासाठी गोव्याचे वन खाते, गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पावले उचलली जात आहेत.
गोव्याला समृद्ध असा जंगलाचा वारसा लाभला आहे. गोव्यातील जैवविविधताही प्रसिद्ध आहे. गोव्यातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात विविध दुर्मिळ वनस्पती, जीव आढळून येतात. ही जंगलातील ठिकाणे, जीव यांना जंगलाचे पावित्र्य अबाधित राखून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
मंत्री राणे यांनी म्हटले आहे की, मला हे जाहीर करताना आनंद वाटत आहे की अनेक इकोटुरिझम प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत. त्यातून पर्यटकांना ट्री हाऊसेस, रस्टिक टेंट्स यांसह इतरही अनेक अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या गोष्टी ऑफर केल्या जात आहेत.
चला, जबाबदारीने निर्सगाशी कनेक्ट होऊया, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
होम स्टे अँड कॅराव्हॅन पॉलिसी
गोव्यात गेल्या काही काळात 'गोवा बीयाँड बीचेस' या संकल्पनेनुसार गोव्याच्या अंतर्गत भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठीच नुकतीच राज्यात होम स्टे अँड कॅराव्हॅन पॉलिसीदेखील जारी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.