Tree Collapse At Mardol Dainik Gomantak
गोवा

Mardol News: घरावर झाड पडून पती-पत्नी म्हार्दोळ येथे जखमी

Tree Collapses At Mardol: गुलमोहरचे भले मोठे झाड अचानकपणे घरावर पडल्याने घराची मोठी हानी झाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सीमेपाईण - म्हार्दोळ येथील एका घरावर झाड पडून पती - पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना आज (शुक्रवारी) दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली. गुलमोहरचे भले मोठे झाड अचानकपणे घरावर पडल्याने घराची मोठी हानी झाली आहे.

या घटनेत रामदास नाईक व त्यांची पत्नी शशिकला नाईक दोघेही जखमी झाले आहेत. शशिकला नाईक यांच्यावर मडकई आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले, तर रामदास नाईक यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

झाड कोसळल्यामुळे घराच्या दर्शनी भागाची पूर्णपणे हानी झाली असून छताचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेवेळी घरातील इतर सदस्य दुसऱ्या खोलीत होते, त्यामुळे ते सुदैवाने बचावले. ही दुर्घटना घडल्यानंतर पंचायत सदस्य तसेच तलाठी व इतरांनी येऊन पाहणी केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT