Borde Goa  Dainik Gomantak
गोवा

Bordem News: अनर्थ टळला! बोर्डे येथे पावसाच्या तडाख्यात कोसळली भलीमोठी फांदी! वीजखात्याने दाखवली तत्परता

Tree Collapses At Bordem: वाऱ्यासह पडलेल्या पावसाच्या तडाख्यात डिचोलीत जिवंत वीजवाहिन्यांवर आंब्याची भलीमोठी फांदी कोसळली. अग्निशमन दल आणि वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतकार्य केल्याने संभाव्य अनर्थ टळला.

गोमन्तक डिजिटल टीम

Bordem Tree Collapsed

डिचोली: वाऱ्यासह पडलेल्या पावसाच्या तडाख्यात डिचोलीत जिवंत वीजवाहिन्यांवर आंब्याची भलीमोठी फांदी कोसळली. अग्निशमन दल आणि वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतकार्य केल्याने संभाव्य अनर्थ टळला.

ही घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा बोर्डे येथील श्री महामाया मंदिर परिसरात मुख्य रस्त्याला जोडून असलेल्या अंतर्गत रस्त्यावर घडली. गुरुवारी सायंकाळी डिचोली परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पावसाच्या तडाख्यात बोर्डे येथे आंब्याची भलीमोठी फांदी कोसळली.

डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच लिडींग फायर फायटर साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली संदीप परब (चालक ऑपरेटर), समीर शेट्ये, आनंद नाईक आणि रूपेश गावस या दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले त्यावेळी वीजवाहिन्या विद्युतभारित होत्या. वीज खात्याला कळविण्यात आल्यानंतर वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वीजप्रवाह बंद केला. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य करून कोसळलेली आंब्याची फांदी बाजूला केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT