Tree Collapsed on house in Siolim Dainik Gomantak
गोवा

शिवोलीत घरांवर झाडांची पडझड

अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाची मदतीस असमर्थता

दैनिक गोमन्तक

शिवोली : बामणवाडा-शिवोली येथील रोहिदास कुंडईकर यांच्या गॅरेजवर मंगळवारी पहाटे गॅरेजलगतचे झाड कोसळून पडल्याने अंदाजे पस्तीस हजारांचे नुकसान झाले. अन्य एका घटनेत मधलेभाट-शिवोली येथील धारगळकर यांच्या घरावर दोन माड कोसळून पडल्याने घराची तसेच घरातील प्रापंचिक साहित्याचीही हानी झाली. या घटनेत धारगळकर कुटुंबीयांचे लाखाेंचे नुकसान झाले.

दरम्यान, दोन्ही ठिकाणच्या घटनांत म्हापसा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तेथील रस्ता चिंचोळा असल्याची सबब पुढे करून घटनास्थळावरून काढता पाया घेतल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते संतोष आगरवाडेकर यांनी या घटनेची माहिती तात्काळ म्हापसा अग्निशमन दलाला देऊन स्वतः मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने गॅरेजवरील झाड दूर केले.

दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या म्हापसा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तेथील रस्ता चिंचोळा असल्याने मदतकार्य करण्यास असमर्थता दर्शविली. गॅरेजमध्ये पार्क करून ठेवलेली कार यावेळी बचावली. दरम्यान, स्थानिक आमदार दिलायला लोबो यांना घटनेची माहिती देऊन संकटग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मोनाली आगरवाडेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

SCROLL FOR NEXT